90 च्या दशकातल्या गाण्यांचा कार्यक्रम

  Ravindra Natya Mandir
  90 च्या दशकातल्या गाण्यांचा कार्यक्रम
  मुंबई  -  

  प्रभादेवी - प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिर येथे गुरुवारी चैत्राली आर्टच्या वतीने गायक मंगेश चव्हाण आयोजित 90 च्या दशकातल्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. 90 च्या दशकातली हिंदी चित्रपटातली रोमँटिक आणि गाजलेली गाणी या कार्यक्रमात सादर करण्यात अाली. यामध्ये साधना सरगम यांनी पाहुण्या कलाकार म्हणून उपस्थिती दर्शवत 3 गाणी सादर केली. त्याच बरोबर मंगेश चव्हाण, कविता पौडवाल, प्रियंका मित्रा, आदित्य चव्हाण , संजना देवराजन यांनीही या कार्यक्रमात गाणी सादर केली. कार्यक्रमाचं मुख्य वैशिष्टय म्हणजे 90 च्या दशकातली अनुराधा पौडवाल यांनी गायलेली गाणी त्यांची मुलगी कविता पौडवाल हिने या वेळी गायली. कार्यक्रमाला खास रंगत आणली ती वाद्य वाजवणाऱ्या 25 वादकांनी. 90 च्या दशकातल्या गाण्यांवर म्युझिकची साथ करत रसिक प्रेक्षकांची मनं या वेळी या वादकांनी जिंकली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.