Advertisement

त्याची, तिची, सर्वांचीच प्रेमाची गोष्ट...


त्याची, तिची, सर्वांचीच प्रेमाची गोष्ट...
SHARES

ज्याला सिनेमाची भाषा कळते आणि ज्याच्या चित्रपटांमध्ये आशयाला मुख्य स्थान असते, असा दिग्दर्शक म्हणजे सतीश राजवाडे. सतीशनं यापूर्वी प्रेमाची गोष्ट नावाचा एक छान सिनेमा केला होता. ती सध्या काय करते या आपल्या नवीन चित्रपटासाठीही त्यानं एक प्रेमाचीच गोष्ट निवडलीय. फरक एवढाच आहे की, ही गोष्ट त्यानं तीन टप्प्यांवर सांगितलीय. बालपण, टीनएज आणि पोस्टतारुण्य अशा तीन अवस्थांमधील एकाच व्यक्तीचं प्रेम रुपेरी पडद्यावर सांगणं ही तशी खूप कठीणच गोष्ट मानायला हवी. परंतु, सतीशनं फ्लॅशबॅकसारखं अवघड तंत्र हाताशी घेवूनही खूप सोप्या पद्धतीनं ती उलगडून सांगितली आहे. उत्तम लेखन, कलाकारांचे सहज अभिनय, सुमधुर गीत आणि संगीताच्या जोरावर हा चित्रपट अगदी छान जमून आला आहे. इतिहासाचं वेड असणाऱ्या आपल्या सर्वच पिढ्यांना हा चित्रपट निश्चितच थोडं मागं डोकावायला लावेल आणि काहीतरी छान पाहिल्याचा आनंदही आपल्या चेहऱ्यावर उमटविण्यात यशस्वी ठरेल.
ही गोष्ट आहे ती अनुराग आणि तन्वीची. एका रियुनियनच्या निमित्तानं संसारात सेटल झालेल्या अनुरागला तन्वीची आठवण येते. ही आठवण त्याला थेट त्याच्या बालपणात घेऊन जाते आणि तन्वीबरोबर जुळलेल्या मैत्रीच्या धाग्यांपासून ते प्रेमापर्यंतच्या सर्व टप्प्यांचे आपणास दर्शन घडते. निरागस प्रेम खरे की शारीरिक आकर्षणातून समोर आलेलं प्रेम खरं, या कोड्यात असतानाच काहीतरी घडतं नि अनुरागच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळतं. ही वळणं नक्की किती आणि काय काय होती, याचा उलगडा म्हणजेच हा चित्रपट.
सतीश राजवाडेच्या कथानकाला सुरेख पटकथेचं रूप आणि तेवढेच छान संवाद लिहिले आहेत ते मनस्विनी लता रवींद्र यांनी. संपूर्ण चित्रपटभर अनुराग आणि तन्वी या दोन व्यक्तिरेखा आयुष्याच्या तीन स्थित्यंतरामध्ये आपणास भेटत राहातात ते फ्लॅशबॅकच्या रूपातून. वर्तमान आणि भूतकाळाशी सांगड घालत प्रेक्षकांना खिळवून ठेवणं काही सोपं काम नव्हतं. परंतु, मनस्विनी यांचं लेखन आणि सतीशच्या अनुभवी दिग्दर्शनामुळे ही गोष्ट छान साधली गेलीय. अनुरागच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सांगितलेल्या या गोष्टीत बालपणाचा भाग विशेष जमलाय. हा भाग काही क्षणांसाठी टाईमपास 1ची आठवण करून देतो. बालपणाच्या तुलनेत टीनएजचा भाग थोडा फिका वाटतो. त्यामुळेच मध्यांतरानंतरचा काही भाग थोडा रेंगाळलाय. शारीरिक आकर्षणाची कल्पना आल्याने त्या प्रेमावर फुली मारणारा टीनएज नायक आपल्या पूर्वीच्याच प्रेमाकडे न जाता उगीचच आणखी एका प्रेमात अडकून गुंता का वाढवतो आणि चित्रपटा हे मात्र तेवढं पटत नाही. मात्र शेवटच्या अर्ध्या तासात चित्रपटाची गाडी पुन्हा रूळावर येते. चित्रपटामध्ये सर्वात लक्षात राहतो तो अंकुश चौधरी.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा