Advertisement

अनिकेत म्हणतोय स्नेहाला ‘तुझी ओढ लागली...’

विनोदी सिनेमातलं हे एकुलतं एक रोमँटिक गाणं आहे. सिनेमात स्नेहाने प्रिया नावाच्या एका खट्याळ मुलीची भूमिका साकारली आहे. अशा खट्याळ मुलीचा रोमान्स कसा असेल, हे या गाण्यातून प्रतीत होणं गरजेचं होतं. तो भाव आनंदीने अतिशय उत्तमरीत्या सादर केला आहे.

अनिकेत म्हणतोय स्नेहाला ‘तुझी ओढ लागली...’
SHARES

दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे यांच्या ‘हृदयात समथिंग समथिंग’ या सिनेमात एक नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अनिकेत विश्वास राव आणि स्नेहा चव्हाण यांची जोडी या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच जुळली आहे. या दोघांवर ‘तुझी ओढ लागली...’ हे रोमँटिक गाणं चित्रीत करण्यात आलं आहे.



रोमँटिक -कॅामेडी सिनेमा

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमातील ‘तुझी ओढ लागली...’ हे गाणं नुकतंच लाँच झालं आहे. सागर खेडेकर यांनी लिहिलेलं हे गीत संगीतकार अनिरूद्ध काळे यांनी संगीतबद्ध केलं आहे. आनंदी जोशी आणि जसराज जोशी यांनी ‘तुझी ओढ लागली’ हे गाणं गायलं आहे. ‘हृदयात समथिंग समथिंग’ या रोमँटिक-कॅामेडी सिनेमातील हे गाणं कथानकात महत्त्वाच्या क्षणी येणारं असून संगीतप्रेमींना भुरळ घालणारं असल्याचं मत अनिकेत व्यक्त करतो.


खट्याळ मुलीचा रोमान्स 

संगीतकार अनिरूद्ध काळे या गाण्याविषयी म्हणाले की, विनोदी सिनेमातलं हे एकुलतं एक रोमँटिक गाणं आहे. सिनेमात स्नेहाने प्रिया नावाच्या एका खट्याळ मुलीची भूमिका साकारली आहे. अशा खट्याळ मुलीचा रोमान्स कसा असेल, हे या गाण्यातून प्रतीत होणं गरजेचं होतं. तो भाव आनंदीने अतिशय उत्तमरीत्या सादर केला आहे. आनंदीच्या आवाजाला जसराजचा आवाज कॉम्पिलमेन्ट करतो, असं वाटल्यामुळे या दोघांचीच निवड गाण्यासाठी झाली. दोघांनीही या गाण्याला योग्य न्याय दिला आहे.


एक आगळी मजा 

या सुमधूर गाण्याबाबत आनंदी जोशी म्हणाली की, जसराजसोबत गाणं गाण्याची एक आगळी मजा आहे. या गाण्यात तो थोडा चढ्या आवाजात गातो, तर मी सॉफ्ट आवाजात गाते. एकाच गाण्यात रोमान्समध्ये असं वैविध्य देतानाही आमची केमिस्ट्री जुळणं हे आमच्यापूढे आव्हान होतं. संगीतकार अनिरूद्ध यांच्यामुळे हे गाणं खूप छान झालं.



५ ऑक्टोबरला प्रदर्शित

अनिकेत आणि स्नेहा यांच्याखेरीज भूषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ यांच्या भूमिका ‘हृदयात समथिंग समथिंग’मध्ये आहेत. ५ ऑक्टोबरला रिलीज होणाऱ्या या सिनेमाची निर्मिती विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण आणि अतुल गुगळे यांनी केली असून, सचिन संत यांनी सहनिर्मिती केली आहे.



हेही वाचा -

नाजुकावर ‘प्रीती सुमने’ उधळणार सुबोध

‘हलाल’ला फिल्मफेअरमध्ये आठ नामांकनं




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा