रुईया महाविद्यालयात चित्रपट महोत्सव

 Kings Circle
रुईया महाविद्यालयात चित्रपट महोत्सव
Kings Circle, Mumbai  -  

माटुंगा - रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या पत्रकारीता विभागाच्या वतीनं चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या चित्रपट महोत्सवाचं नाव मावा (मेन अगेंस्ट व्हायलेंस अँड अव्युज) असं आहे. हा चित्रपट महोत्सव दोन दिवस असणार आहे. तरुणाईतल्या प्रतिभेला वाव देण्यासाठी हा मोहत्सव आयोजित केला आहे. यामध्ये शॉर्ट फिल्म, एडिटिंग, फोटोग्राफी, नृत्य अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. 6 ते 9 जानेवारी दरम्यान शॉर्ट फिल्म तर अन्य स्पर्धा 18 आणि 19 जानेवारीला होणार आहेत. शॉर्ट फिल्मसाठी नाव नोंदणीची मुदत 5 जानेवारीपर्यंत ठेवण्यात आली आहे. तर अन्य स्पर्धांच्या नोंदणीसाठी 10 जानेवारी ही तारीख अंतीम असणार आहे.

Loading Comments