रुईयात फेस्टिव्हलची जय्यत तयारी

 Kings Circle
रुईयात फेस्टिव्हलची जय्यत तयारी

माटुंगा - मुंबईत सध्या अनेक महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. एका पेक्षा एक वेगवेगळ्या थीम आणि स्पर्धांमुळे महाविद्यालयांचे कॅम्पस गजबजून गेले आहेत. अशा फेस्टिव्हलच्या वातावरणात रुईया महाविद्यालयाच्या केमिस्ट्री विभागाचा फेस्टिव्हल देखील जल्लोषात साजरा करण्यासाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत. केम फेस्ट रीअॅक्ट असं या फेस्टीव्हलचं नाव आहे. नुक्लिअर केमिस्ट्री ही या फेस्टिव्हलची थीम असून 23 आणि 24 डिसेंबरला हा फेस्टिव्हल रुईया महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये रंगणार आहे. हा अांतर महाविद्यालयीन फेस्टिव्हल असून यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. रांगोळी आर्ट, स्लोगन मेकिंग, फेस आर्ट या स्पर्धांचाही यात समावेश असणार आहे.

Loading Comments