सांज स्वरांची मैफल लाइव्ह पाहा

 Pali Hill
सांज स्वरांची मैफल लाइव्ह पाहा

शिवाजी पार्क - दिवाळीनिमित्त 'सांज स्वरांची' या संगीत मैफलीचं आयोजन करण्यात आलंय. शिवाजी पार्क इथल्या महात्मा गांधी जलतरण तलावाजवळ शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू झाला आहे. मुंबई लाइव्हवर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहा. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या वेळी उपस्थित आहेत.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, वैशाली माडे, कार्तिकी गायकवाड, ओजस अधिया, डॉ. संकेत भोसले यांचे गायन सुरू आहे. याशिवाय 'अभंगवारी'ही सुरू आहे. या कार्यक्रमात काव्यनिवेदन कवी अरुण म्हात्रे यांनी केलं. रसिकहो मुंबई लाइव्हवर गायनाबरोबरच तुम्हीही घ्या मनोरंजनाचा फराळ आणि हास्याच्या चमचमीत मेजवानीचा आस्वाद. 

Loading Comments