'शौर्य गाथा अभिमानाची' मध्ये सचिन खेडेकरांचा आवाज

 Mumbai
'शौर्य गाथा अभिमानाची' मध्ये सचिन खेडेकरांचा आवाज
Mumbai  -  

दादर - झी युवा वाहिनीवरील 'शौर्य गाथा अभिमानाची' या मालिकेत अभिनेता सचिन खेडेकर यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. आपल्या भारदस्त आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अभिराज्य गाजवणाऱ्या सचिन खेडेकर यांनी या मालिकेतून नक्कीच भूमिका करायला आवडेल, तूर्तास माझा आवाज मालिकेतून सर्वांपर्यंत पोहोचत असल्याचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच प्रबोधनात्मक मालिका केल्या पाहिजेत जेणेकरून युवा पिढीला आणि समाजाला त्याचा फायदा होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Loading Comments