Advertisement

श्रमदान करायला सई सज्ज


श्रमदान करायला सई सज्ज
SHARES

महाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला सई ताम्हणकरने पुढाकार घेतला आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर येत्या १ मे रोजी श्रमदान करणार आहे. सई गेली तीन वर्ष पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात पाणीटंचाईविरहित महाराष्ट्रासाठी आपलं योगदान देते. यंदाही आपल्या बाकी सर्व व्यावसायिक जबाबदाऱ्यांना बाजूला ठेवतं, 1 मे रोजी सई श्रमदानात सक्रिय सहभाग नोंदवले.


मी हे स्वानुभवाने सांगु शकते, की, रणरणत्या उन्हात श्रमदान करताना आपला घाम जेव्हा मातीत मिसळतो. तेव्हा मातीच्या येणाऱ्या सुगंधाची बरोबरी कोणताही महागडा परफ्युम करू शकणार नाही. त्यामुळेच पाणी फाऊंडेशन जेव्हा जेव्हा श्रमदानासारखे उपक्रम आयोजित करतं, तेव्हा त्यात सक्रिय सहभाग घेणं, ही माझ्यासाठी प्राथमिकता असते.
- सई ताम्हणकर, अभिनेत्री

'पाणी फाऊंडेशनसाठी मी गेल्या तीन वर्षात पश्चिम महाराष्ट्र फिरले आहे. एकदा एक सरपंच मला हातात कुदळ-फावडा घेऊन काम करताना पाहून प्रतिक्रिया देत म्हणाले होते की, मी आजपर्यंत कुठल्याच अभिनेत्रीला पाण्यासाठी आमच्या गावात येऊन काम करताना पाहिलं नव्हतं. या प्रतिक्रियेने माझा काम करण्याचा हुरूप अजूनच वाढला' असंही सई म्हणाली

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा