भारतीय वीरांसह सलीम, मधुर, हेलन, सुचेता भिडे-चाफेकर यांना मा. दिनानाथ मंगेशकर पुरस्कार

या कार्यक्रमात लतादीदी यांनी शहीदांना श्रद्धांजली म्हणून पिता मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतीत एक कोटी रुपये, तर मंगेशकर परिवार आणि दिनानाथ स्मृती प्रतिष्ठानातर्फे १८ लाख रुपये दान केले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथील पडद्यामागील कलाकार कै. विजय महाडिक यांच्या कुटुंबियांनाही ५०,००० रुपयांचं आर्थिक सहाय्य करण्यात आलं.

  • भारतीय वीरांसह सलीम, मधुर, हेलन, सुचेता भिडे-चाफेकर यांना मा. दिनानाथ मंगेशकर पुरस्कार
  • भारतीय वीरांसह सलीम, मधुर, हेलन, सुचेता भिडे-चाफेकर यांना मा. दिनानाथ मंगेशकर पुरस्कार
SHARE

संगीतासोबतच विविध क्षेत्रात उपयुक्त कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या कार्याचा गौरव दरवर्षी मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं करण्यात येतो. यंदाचा मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळाही षण्मुखानंद सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाला.


पुरस्कार जवानांना समर्पित 

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींना मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं गौरविण्यात येतं. यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी सीआरपीएफ डायरेक्टर जनरल विजयकुमार यांना गृह मंत्रालयाअंतर्गत भारताच्या जवानांसाठी सामाजिक कार्य करणारी मान्यताप्राप्त संस्था 'भारत के वीर'साठी सम्मानित केलं गेलं. प्रतिष्ठानानं या वेळी हा पुरस्कार जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यातील शाहिद सीआरपीएफ जवानांना समर्पित केला गेला. 


विजयकुमार सोहळ्याच्या अध्यक्षपदी 

या कार्यक्रमात लतादीदी यांनी शहीदांना श्रद्धांजली म्हणून पिता मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतीत एक कोटी रुपये, तर मंगेशकर परिवार आणि दिनानाथ स्मृती प्रतिष्ठानातर्फे १८ लाख रुपये दान केले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथील पडद्यामागील कलाकार कै. विजय महाडिक यांच्या कुटुंबियांनाही ५०,००० रुपयांचं आर्थिक सहाय्य करण्यात आलं. विजयकुमार या सोहळ्याच्या अध्यक्षपदी होते, तर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 


ह्यांना मिळाले पुरस्कार 

मुख्य पुरस्कारांमध्ये यंदा संगीत आणि कला क्षेत्रातील नामवंत शास्त्रीय नर्तकी सुचेता भिडे-चाफेकर यांना मा. दीनानाथ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. मा. दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव सलीम खान यांना प्रदान करण्यात आला. भारतीय चित्रपटसृष्टीत महत्वपूर्ण योगदानासाठी दिग्दर्शक मधुर भंडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार, तर हेलन यांना चित्रपटसृष्टीत योगदानासाठी सन्मानित केलं गेलं. साहित्य क्षेत्रात वसंत आबाजी डहाके यांना वागविलासिनी पुरस्कारानं पुरस्कृत केलं गेलं. भद्रकाली प्रॉडक्शनचे 'सोयारे सकाळ' हे नाटक मोहन वाघ पुरस्कारानं वर्षातील सर्वोत्तम नाटक म्हणून गौरविण्यात आलं. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तालयोगी आश्रमचे पं. सुरेश तळवळकर यांना आनंदमयी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.हेही वाचा -

पुलं नंतर बाबासाहेब साकारणं हा दुग्धर्शकरा योग : सागर देशमुख

रवी जाधवच्या 'रंपाट'चं संगीत प्रकाशन
संबंधित विषय
ताज्या बातम्या