सलमानची दिलदारी, छायाचित्रकार हरीश नेगीला आर्थिक मदत

Bandra west
सलमानची दिलदारी, छायाचित्रकार हरीश नेगीला आर्थिक मदत
सलमानची दिलदारी, छायाचित्रकार हरीश नेगीला आर्थिक मदत
सलमानची दिलदारी, छायाचित्रकार हरीश नेगीला आर्थिक मदत
See all
मुंबई  -  

बॉलिवूडचा 'दबंग' - सलमान खान जसा वादग्रस्त आहे तसाच तो त्याच्या दानशूरतेसाठीही प्रसिद्ध आहे. यापुर्वीही त्याने अनेकदा गरजूंना सढळ हस्ते मदत केली आहे. नुकतीच त्याने एका खासगी वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनच्या उपचारासाठी आर्थिक मदत दिली आहे.

याबाबतची माहिती अशी की, रविवार, 2 एप्रिलला वृत्तासाठी चित्रिकरण करताना एका खासगी वृत्तवाहिनीचा कॅमेरामन हरीश नेगी अचानक कोसळला. मेंदूतील रक्तपुरवठा थांबल्याने त्याला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तो मृत्यूशी झूंज देत आहे. आर्थिकदृष्ट्या हरीश फारसा सक्षम नाही. लिलावतीसारख्या महागड्या रुग्णालयात हरीशच्या उपचारासाठी जास्तीत जास्त रक्कम जमवण्यासाठी हरीशचे जुने सहकारी, मित्रपरिवार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरिशच्या उपचारासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे तर सलमानच्या 'बिंग ह्युमन, द सलमान खान फाऊंडेशन'ने हरीशला 1 लाख रुपयांची मदत केली आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनच्या उपचारांसाठी पैशाची गरज असल्याचं जेव्हा सलमानला समजलं, तेव्हा त्याने तातडीने 1 लाख रुपये लिलावती रुग्णालयात पाठवले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.