आकाश म्हणतोय दोस्तीसाठी कायपन...

 Mumbai
आकाश म्हणतोय दोस्तीसाठी कायपन...

सैराट फेम आकाश ठोसर लवकरच महेश मांजरेकर यांच्या सिनेमात झळकणार आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. नुकतंच सलमान खान ने त्याच्या ट्विटर अकाउंट वर ' HE IS BACK ' असं म्हणत एक फोटो शेअर केला होता. ते पाहून प्रत्येकालाच त्या सिनेमाबद्दलची उत्सुकता निर्माण झाली होती. पण आता सलमान हे त्या सिनेमाच पोस्टर ट्विट केलय.

#AakashThosar is back with his #FU look in #MaheshManjrekar's @FUMarathiMovie Releasing on #2June  दोस्तीसाठी कायपन!!! असं म्हणत त्याने ते पोस्टर शेअर केलय.
ह्यात आकाश साधाभोळा न दिसता आता  कॉलेजमधील विद्यार्थ्याच्या भूमिकेत कूल आणि डॅशिंग लूकमध्ये दिसेल. पांढरे टीशर्ट, काळ्या रंगाचे जॅकेट, डोळ्यावर गॉगल आणि गळ्यात लॉकेट घातलेला आकाश हात उंचावून या लूकमध्ये दिसतो.

महेश मांजरेकर यांच्या आगामी ‘एफयू’ या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये दिसणारा लूक बघता अभिनेता आकाश ठोसर आता अतिशय रॉकिंग अंदाजात आणि दमदार भूमिकेसह चाहत्यांच्या भेटीला येणार आहे हे दिसून येते.

पण ह्या सिनेमाच्या नावात 'FU' म्हणजे नक्की अर्थ काय हे मात्र इतक्यात समजू शकणार नाहीये.


Loading Comments