एअर इंडिया मॉडर्न स्कूलतर्फे 'सनी पवार'चा सत्कार

 Marin Drive
एअर इंडिया मॉडर्न स्कूलतर्फे 'सनी पवार'चा सत्कार
एअर इंडिया मॉडर्न स्कूलतर्फे 'सनी पवार'चा सत्कार
एअर इंडिया मॉडर्न स्कूलतर्फे 'सनी पवार'चा सत्कार
See all

मुंबई - 'लायन' चित्रपट फेम तसेच ऑस्कर सोहळ्यात वाहवा झालेला बालकलाकार सनी पवारचा एअर इंडिया मॉडर्न स्कूलतर्फे सत्कार करण्यात आला. त्याला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे कौतुक करण्यासाठी एअर इंडिया मॉडर्न स्कूलतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला.

एअर इंडिया मॉडर्न शाळा व्यवस्थापन आणि प्राचार्य विभागातर्फे बालकलाकार सनी पवारला लायन चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट युवा परफॉर्मर पुरस्कार मिळाल्याबद्दल हा गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एअर इंडिया मॉडर्न शाळेतर्फे इंडियाचे पश्चिम विभागाचे प्रादेशिक संचालक मुकेश भाटिया आणि मंडळाचे सभासद आणि डायरेक्टर फायनान्स अँड ऍडिशनल चार्जेस पर्सनलचे विनोद हेजमाडी यांच्या हस्ते बालकलाकार सनी पवारला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी एअर इंडिया मॉडर्न स्कूलच्या प्राध्यापिका आणि शिक्षकांनीसुद्धा सनी पवारचा सत्कार केला. 

सनी पवार हा एअर इंडिया मॉडर्न शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. सनीची लायन चित्रपटात सरु नावाच्या लहान मुलाची भूमिका साकारण्यासाठी निवड करण्यात आली होती. हा चित्रपट सरु ब्रेइरली यांच्या 'अ लाँग अवे होम' या पुस्तकावर आधारित असून, सनीची लहान सरु यांच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती. सनी याने चित्रपटातील त्याच्या अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली आणि कौतुकाची थाप मिळवली. त्याला बेस्ट यंग परफॉर्मरसाठीच्या दि क्रिटीक चॉईस मूवी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या चित्रपटाला ऑस्करमध्ये नामांकनही मिळाले होते. या कार्यक्रमात सनीच्या कुटुंबासह त्याचा मित्रपरिवारही उपस्थित होता. 

Loading Comments