अभिनेता संजय दत्तला मोठा दिलासा; अटक वॉरंट झाले रद्द


SHARE

बॉलिवूड दिग्दर्शक शकील नुरानी याला धमकी दिल्याप्रकरणी तसेच त्याला दिलेला धनादेश न वटल्याच्या प्रकरणी अभिनेता संजय दत्तला मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयाने संजय विरुद्ध काढलेले जामीनपात्र अटक वॉरंट रद्द केले आहे. शनिवारी याच न्यायालयाने खटल्याच्या तारखांना हजर न राहिल्याचं सांगत संजूबाबा विरुद्ध अटक वॉरंट काढले होते. पण सोमवारी संजूबाबा न्यायालयात हजर झाला आणि त्यानंतर वॉरंट रद्द करण्यात आले.

जेव्हा संजूबाबा दुपारच्या सुमारास अंधेरी न्यायालयात आला तेव्हा न्यायालय परिसराचा मूड अचानक बदलला, संजय दत्तला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी उसळली, कोणी त्याच्याबरोबर सेल्फी कढण्याच्या प्रयत्नात होते, तर कोणी त्याला मोबाइल कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करत होते. या सगळ्या गोंधळात वकीलही मागे राहिले नाहीत. या वेळी संजूबाबाला बघून त्याच्याशी हस्तांदोलन करण्याचा मोह वकिलांना देखील आवरेनासा झाला. संजय दत्त न्यायालयात येऊ शकला नाही. मात्र यानंतराच्या सगळ्या तारखांना संजय दत्त हजर राहील अशी ग्वाही यावेळी संजयच्या वकिलांनी न्यायालयात दिली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या