Advertisement

‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात मृत्यू

ही दुर्घटना उत्तर भारतात घडली

‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात मृत्यू
Image Source: Instargram vaibhaviupadhyaya
SHARES

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे निधन झाले आहे. मंगळवारी (२३ मे) रोजी एका भीषण रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला. ती ३२ वर्षांची होती. वैभवी उपाध्यायच्या निधनामुळे सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभवी उपाध्यायच्या कारचा अपघात सोमवारी (२२ मे) हिमाचल प्रदेशातील कुल्लू या ठिकाणी झाला. हा अपघात इतका भीषण होता की वैभवीचा जागीच मृत्यू झाला.

वैभवी ही तिच्या होणाऱ्या पतीबरोबर फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी एका वळणावर त्यांची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि हा अपघात झाला. या अपघातानंतर त्यांची कार थेट दरीत कोसळली. वैभवीच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेचे निर्माते जेडी मजेठीया यांनी अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. वैभवीच्या निधनाबद्दल बोलताना जेडी म्हणाले की, “मला खरच खूप मोठा धक्का बसला आहे. ती एक सुंदर व्यक्ती आणि अफलातून अभिनेत्री होती. आयुष्य किती अनिश्चित आहे हे पुन्हा एकदा समोर आलं.”


वैभवीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘सीआयडी’, ‘अदालत’ आणि ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या तिच्या काही गाजलेल्या मालिका आहेत. यातही ‘साराभाई’ या मालिकेतील जास्मीन या पात्राने तिला विशेष ओळख मिळवून दिली. वैभवीने २०२० मध्ये ‘छपाक’ या चित्रपटातही काम केले होते. यावेळी ती प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणबरोबर झळकली होती. 



त्याबरोबरच तिने ‘तिमिर’ (२०२३) या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. गुजराती कलाविश्वात तिचं मोठं नाव होतं. वैभवीने ‘क्या कसूर है अमला का’ आणि ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ या डिजीटल सीरिजमध्येही काम केले.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा