Advertisement

या कलाकारांच्या 'सर्व लाईन व्यस्त आहेत'!

चित्रपटाचं शीर्षक जरी 'सर्व लाईन व्यस्त आहेत', असं असलं तरी यातली 'लाईन' जरा भलतीच दिसत आहे आणि ती व्यस्त का आहे? हे चित्रपट पाहिल्यावरच समजणार आहे. शीर्षक आणि टीजरवरून हा चित्रपट धमाल कॉमेडी असणार हे जाणवतं.

या कलाकारांच्या 'सर्व लाईन व्यस्त आहेत'!
SHARES

चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हटले की त्यांच्या लाईन व्यस्त असणं साहाजिक आहे. पण एखाद्या चित्रपटातही त्यांच्या लाईन व्यस्त असणं हे काहीसं कुतूहल वाढवणारं आहे.


टीझर प्रदर्शित

'सर्व लाईन व्यस्त आहेत...' हे वाक्य आपण दिवसातून अनेकदा ऐकतो. नेहमी एकाच बाईच्या तोंडून सतत हे वाक्य ऐकल्याने ते आपल्या चांगलंच अंगवळणी पडलं असेल. आता  या शीर्षकाचा चित्रपटही पहायला मिळणार आहे. या चित्रपटात 'सर्व लाईन व्यस्त आहेत' असं कोणकोणते कलाकार म्हणत आहेत ते दाखवणारा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.


धमाल कॉमेडी 

चित्रपटाचं शीर्षक जरी 'सर्व लाईन व्यस्त आहेत', असं असलं तरी यातली 'लाईन' जरा भलतीच दिसत आहे आणि ती व्यस्त का आहे? हे चित्रपट पाहिल्यावरच समजणार आहे. शीर्षक आणि टीजरवरून हा चित्रपट धमाल कॉमेडी असणार हे जाणवतं. महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, कमलाकर सातपुते, गौरव मोरे, नीथा शेट्टी आणि राणी अगरवाल या कलाकारांच्या लाईन या चित्रपटात व्यस्त असणार आहेत.


११ जानेवारीला प्रदर्शित

कॉमेडीचे हुकमी एक्के असलेली ही मंडळी नव्या वर्षात नवा धमाका घेऊन येत आहेत. या चित्रपटातील काही कलाकार यापूर्वी बऱ्याचदा एकत्र आलेले आहेत, पण काही मात्र प्रथमच एकमेकांसोबत काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे एक वेगळं रसायन या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आल्याचंही पाहायला मिळणार आहे. स्टेलारीया स्टुडियो निर्मिती आणि अमोल उतेकर यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रदीप मेस्त्री यांनी केलं आहे. 'सर्व लाईन व्यस्त आहेत' हा धमाल चित्रपट नव्या वर्षात म्हणजेच ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा - 

'कुंकू, टिकली...' जमिनदोस्त, 'राधा...' थोडक्यात बचावली!

आशिष-दीपाच्या 'हिंदुस्तान टॉकीज'चा 'माऊली'
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा