Advertisement

आशिष-दीपाच्या 'हिंदुस्तान टॉकीज'चा 'माऊली'

हिंदुस्तान टॉकीजने अभिनेता रितेश देशमुख अभिनीत आणि जियो स्टुडियोज तसंच मुंबई फिल्म कंपनीसह मराठी सिनेमाच्या सर्वात मोठ्या बजेट मूव्ही 'माऊली' चित्रपटाची सह-निर्मिती करून प्रादेशिक सिनेमांपासून आपली वाटचाल सुरू केली आहे.

आशिष-दीपाच्या 'हिंदुस्तान टॉकीज'चा 'माऊली'
SHARES

चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनेता म्हणून बरीच वर्ष काम केल्यानंतर आशिष चौधरीची पावलं चित्रपट निर्मितीकडे वळली आहेत. आपल्या आजवरच्या अनुभवाच्या बळावर आणि कौटुंबिक मित्र व उद्योजिका दीपा परदसानी यांच्या साथीने आशिषने निर्मिती क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आहे.


प्रादेशिक सिनेमांपासून वाटचाल

आशिष-दीपा यांच्या या निर्मिती संस्थेचं नाव आहे हिंदुस्तान टॉकीज... हिंदुस्तान टॉकीजने अभिनेता रितेश देशमुख अभिनीत आणि जियो स्टुडियोज तसंच मुंबई फिल्म कंपनीसह मराठी सिनेमाच्या सर्वात मोठ्या बजेट मूव्ही 'माऊली' चित्रपटाची सह-निर्मिती करून प्रादेशिक सिनेमांपासून आपली वाटचाल सुरू केली आहे. योग्य विषयांवर आधारित क्षेत्रीय आणि व्यावसायिक सिनेमा तयार करून त्यांना मदत करणं हे निर्माते म्हणून हिंदुस्तान टॉकीजच्या वतीने आशिष आणि दीपा यांचे प्रयत्न असतील.


मार्केट लीडर्ससोबत काम

आपल्या या नव्या प्रयत्नाबाबत आशीष म्हणाला की, हिंदुस्तान टॉकीजच्या माध्यमातून आम्ही लक्षवेधी स्क्रिप्ट्सवर गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहोत. दीपा आणि मला दर्जेदार प्रोजेक्ट्स बनवण्याची इच्छा आहे. यामुळेच जेव्हा रितेश आणि जिओबरोबर सहकार्य करण्याची संधी मिळाली, तेव्हा ते आमच्यासाठी योग्य पाऊल ठरलं. याखेरीज मुंबई फिल्म कंपनी आणि जियो स्टुडिओसारख्या मार्केट लीडर्ससोबत काम करणं आनंददायी बाब आहे. 


ऑनलाइन प्लॅटफाॅर्म

या नव्या व्हेंचरबाबत दीपा परदसानीही म्हणाल्या की, आम्ही नवीन लेखकांसोबत काम करण्यास तयार आहोत. आम्हाला वाटतं की, त्यांच्याकडे सशक्त कंटेंट असतो. यासोबतच आम्ही ऑनलाइन प्लॅटफाॅर्मही ओपन करणार आहोत, ज्यामुळे अतिरीक्त पोकळी भरून निघेल. सर्वचप्लॅटफाॅर्मचा योग्य वापर करुन सर्व प्रदेशांत पोहोचणं हे आमचं व्हिजन आहे.


वेबक्षेत्रातही गुंतवणूक 

'माऊली' या मराठी चित्रपटानंतर हिंदुस्तान टॉकीज सुरुवातीच्या काळात पंजाबी, बंगाली आणि नंतर इतरही प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती करणार आहेत. पुढील वर्षी हिंदुस्तान टॉकीज वेबक्षेत्रातही गुंतवणूक करणार आहे.हेही वाचा - 

तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा 'मुंबई पुणे मुंबई' हा पहिला मराठी चित्रपट

नाशिकची गाथा सांगणार 'नाशिकचा मी आशिक...'
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा