Advertisement

'कुंकू, टिकली...' जमिनदोस्त, 'राधा...' थोडक्यात बचावली!

'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरू होतं. तिथल्या लोकांना सदर कारवाईबाबतची काहीच कल्पना नसल्याने काहीच कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे सुरुवातीला थोडीशी वादावादी झाली आणि प्रकरण हाणामारीपर्यंतही पोहोचल्याची माहिती मिळाली आहे.

'कुंकू, टिकली...' जमिनदोस्त, 'राधा...' थोडक्यात बचावली!
SHARES

कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या दोन मालिकांना महापालिकेच्या तोडक कारवाईचा फटका बसला आहे. यात 'कुंकू टिकली आणि टॅटू' या मालिकेचा सेट महापालिकेने जमिनदोस्त केला असून, 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेचा सेट थोडक्यात बचावला आहे.


सेट जमिनदोस्त

'कुंकू टिकली आणि टॅटू' आणि 'राधा प्रेम रंगी रंगली' या दोन मालिकांचं चित्रीकरण मालाड येथील मालवणी विभागात सुरू आहे. 'कुंकू टिकली आणि टॅटू' या मालिकेचा सेट मनपाच्या अनधिकृत बांधकाम विभागाने बुलडोझर लावून जमिनदोस्त केला. त्यानंतर शेजारीच असलेल्या 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेच्या सेटच्या दिशेने त्यांनी मोर्चा वळवला.


कारवाई तात्पुरती थांबवली

त्यावेळी सेटवर मालिकेचं शूटिंग सुरू होतं. तिथल्या लोकांना सदर कारवाईबाबतची काहीच कल्पना नसल्याने काहीच कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे सुरुवातीला थोडीशी वादावादी झाली आणि प्रकरण हाणामारीपर्यंतही पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्यातून सामोपचाराने मार्ग काढण्यात आला. मनपाच्या अधिकाऱ्यांनी मालिकेशी संबंधित असलेल्या व्यक्तींशी चर्चा करून तोडक कारवाई तात्पुरती थांबवली. चर्चेनंतर मनपाचं पथक तिथून निघून गेलं.


अचानक कारवाई

'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सचित पाटीलच्या म्हणण्यानुसार, महापालिकेने सेटवर कारवाई करण्याआधी प्रोडक्शन हाऊस तसंच वाहिनीला सूचित करण्याची गरज होती. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास आमचा नकार नाही, पण शूटिंग सुरू असताना अडथळा आला तर खूप नुकसान होतं. कारवाई करणार असल्याची कल्पना अगोदर दिली गेली, असती तर आम्ही दुसरीकडे शूट केलं असतं. कलाकार म्हणून आम्हाला काहीच ठाऊक नव्हतं.हेही वाचा-

तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा 'मुंबई पुणे मुंबई' हा पहिला मराठी चित्रपट

आशिष-दीपाच्या 'हिंदुस्तान टॉकीज'चा 'माऊली'संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा