Advertisement

मकरंदच्या दरबारी सयाजी शिंदे, तुकाराम मुंढेंची हजेरी


मकरंदच्या दरबारी सयाजी शिंदे, तुकाराम मुंढेंची हजेरी
SHARES

कलर्स मराठीवरील 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' कार्यक्रमामध्ये बरेच नामवंत कलाकार आणि इतर क्षेत्रांमधील दिग्गज व्यक्ती स्वत:बद्दलच्या बऱ्याच माहिती नसलेल्या गोष्टी सांगतात. त्यामुळे त्यांची अप्रकाशित बाजू प्रेक्षकांना समजते. या आठवड्यामध्ये या कार्यक्रमात महाराष्ट्राचे सयाजी शिंदे आणि तुकाराम मुंढे ही दोन लाडकी व्यक्तिमत्व सहभागी होणार आहेत. 


वर्षा बंगला की अर्चना वहिनी?

मातीशी नातं आणि कामाशी इमान जपणाऱ्या अस्सल पाहुण्यांसोबत रंगणार बेधडक गप्पा. म्हणजेच सयाजी शिंदे आणि तुकाराम मुंढे या कार्यक्रमामध्ये झळकणार आहेत. आपल्या कारकिर्दीतील अनेक अनुभव, गोष्टी सांगणार आहेत. सयाजी शिंदे त्यांच्या आईबरोबरचे काही किस्से सांगतील. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक मकरंद अनासपुरेही सयाजी आणि तुकाराम मुंढे यांना प्रश्न विचारताना दिसेल. सयाजी यांना विचारलं कोणाला उभं करण्यासाठी कष्ट घ्यावेत माणूस की झाड? त्यावर ते म्हणाले की, झाड. तुकाराम मुंढे यांना विचारलं कोणत्या फोनचं टेन्शन येतं वर्षा बंगला की अर्चना वहिनींच्या? यांसारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना कार्यक्रमामध्ये मिळतील. 


अधिकारी कसे तयार होतील?

तुकाराम मुंढे यांनी यावेळी एक खंतही व्यक्त केली, माझ्यासारखे १० अधिकारी तयार होऊ शकतील. पण माझा हा प्रश्न आहे की, तुम्ही एक अधिकारी टिकवू शकत नाही १० अधिकारी कसे तयार होतील? १० नव्हे तर शंभर अधिकारी कसे तयार होऊ शकतील याचा खुलासा देखील त्यांनी यावेळी केला. सयाजी यांनी हाती घेतलेल्या 'वनराई' उपक्रमाच्या प्रवासाबद्दल सांगितलं आणि झाडं आणि पर्यावरणाबाबत प्रेम व्यक्त करत प्रत्येकाने एक झाडं लावा आणि ते जगवा, असं आवाहनही त्यांनी केलं.


चक्रव्यूह राऊंड

सयाजी शिंदे आणि तुकाराम मुंढेना मकरंद यांनी चक्रव्यूह राऊंडमध्ये जरा वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले ... सयाजी यांना ४ माणसांबद्दल तर तुकाराम मुंढे यांना ४ शहरांबद्दल आवडणाऱ्या आणि खटकणाऱ्या गोष्टी विचारल्या. स्पर्धा परीक्षकांसाठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांना मोलाचा सल्ला देखील मुंढेनी दिला. यावेळी नाव तुकाराम असून देखील सोलापूर येथील VVIP पासेस बंद करण्यामागचं कारण देखील मुंढे यांनी सांगितलं.


तो प्रसंग टर्निंग पॉईंट

मनाला चटका लावणारा अनुभव सांगताना मुंढे म्हणाले की, २००६ रोजी शिकाऊ जल्हाधिकारी म्हणून वाशी नगरपालिकेमध्ये अतिक्रमण विभागामध्ये कार्यरत असताना जवळपास १५०० अतिक्रमण काढली. त्यावेळेस मनाची घालमेल करणारा प्रसंग समोर आला. काय निर्णय घ्यावा कळत नव्हतं. परंतु मी असं म्हणेन की तो प्रसंग माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. काय होता तो प्रसंग ? काय घडल होतं त्यावेळेस? का म्हटलं गेलं असंवेदनशील प्रशासन? हे प्रेक्षकांना कार्यक्रमामध्ये समजेल.



हेही वाचा - 

प्रसिद्ध गायक मोहम्मद अझीज यांचं आकस्मिक निधन

विजय पाटकरांची चक्रम मास्तरकी!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा