अजय देवगणच्या दुसऱ्या मराठी सिनेमाचा मुहूर्त

 Mumbai
अजय देवगणच्या दुसऱ्या मराठी सिनेमाचा मुहूर्त

अजय देवगणने नुकतंच त्याच्या नवीन मराठी सिनेमाचं चित्रीकरण सुरु केल्याचं समजतंय. त्याने स्वतःच ट्विट करून ही बातमी दिली आहे. त्याबरोबर त्याने एक फोटोही शेअर केलाय ज्यात काजोल क्लॅपबोर्ड वाजवताना दिसत आहे. या ट्विटमध्ये अजयने  ‘आज आमच्या प्रॉडक्शनच्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ झाला आहे. सर्वांना शुभेच्छा’ असं म्हणत हा फोटो शेअर केला आहे. या सिनेमाचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही. पण या सिनेमाचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं असून प्रमुख भूमिकेत अभिनेते नाना पाटेकर दिसणार आहेत.

नानांनी अजयबरोबर ‘अपहरण’, ‘राजनीती’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या अगोदर अजयच्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत ‘विट्टी दांडू’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

Loading Comments