Advertisement

संगीतातील 'देव' देवाघरी, ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं निधन


संगीतातील 'देव' देवाघरी, ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं निधन
SHARES

ज्येष्ठ संगीतकार, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचं सोमवारी मध्यरात्री दीर्घ आजारामुळे निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांनी दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीतविश्वातील 'देवमाणूस' हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.


उपचाराला प्रतिसाद नाही

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांना चिकुनगुनियाची लागण आणि न्यूमोनिया जडल्याचं निदान झालं होतं. त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र सोमवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालावली.


कधी झाला जन्म ?

यशवंत देव यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1926 साली झाला होता. मराठी चित्रपटसृष्टीत एक प्रतिभावंत गीतकार आणि संगीतकार, अशी त्यांची ओळख राहिली. याशिवाय नाट्यपद, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगुलगीत, लोकगीत त्यांनी संगीतबद्ध केलं.


त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी

‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतिच्या फुला..’, ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘येशिल येशिल येशिल राणी’ अशी अनेक गीतं त्यांनी संगीतबद्ध केली. याचबरोबर अनेक नाटकांसाठीही त्यांनी संगीत दिलं होतं.

संबंधित विषय
Advertisement