Advertisement

वानखेडे वादातून शाहरुखला क्लीन चिट


वानखेडे वादातून शाहरुखला क्लीन चिट
SHARES

मुंबई - अभिनेता शाहरुख खानला २०१२ साली वानखेडे स्टेडियममध्ये केलेल्या शिवीगाळीप्रकरणी मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणी शाहरुख विरोधात कोणताही दखलपात्र गुन्हा सिद्ध न होत असल्याचं मरिन ड्राईव्ह पोलिसांनी दंडाधिकारी कोर्टाला सांगितलं आहे.
या प्रकरणी शाहरुखचा जबाब नोंदवला असून त्याने कोणतीही शिवीगाळ केली नसल्याचं सांगितलं आहे.

सामाजिक कार्यकर्ता अमित मारू यांनी शाहरुख विरोधात लहानमुलांसमोर शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. ते घटनास्थळी हजर नसून टीव्ही वर बघून तसेच युट्यूब वरील व्हिडिओच्या आधारावर हा आरोप करण्यात आला होता, असे देखील पोलिसांनी म्हटलंय. २०१२ साली वानखेडे स्टेडियमवरील सामना कोलकत्ता नाईट रायडर्सने जिंकल्यानंतर शाहरुख खान आणि त्याच्या सोबत असलेली बच्चे कंपनी मैदानावर उतरली होती, मात्र या बच्चे कंपनीला सुरक्षा रक्षक विकास दळवी यांनी रोखले होते, त्यावरून शाहरुख आणि विकास यांच्यात बाचाबाची झाली होती. पोलिसांनी सुरक्षा रक्षक विकास दळवी यांचा देखील जबाब घेतला असून त्यातही मुलांसमोर शिवीगाळीचा उल्लेख नसल्याचं पोलिसांनी आपल्या रिपोर्ट मध्ये म्हटलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा