शिवा–सिध्दीच्या आयुष्यात हे घडणार!


SHARE

प्रत्येक नात्यामध्ये विश्वास खूप महत्वाचा असतो. असं म्हणतात की, नात्यामध्ये विश्वास आणि प्रेम असेल तर कुठल्याही संकटाला सामोरी जाण्याचं बळ येतं. पण जीव झाला येडापिसा मालिकेत लग्नाआधीपासूनच शिवा आणि सिध्दीचं एकमेकांशी कधीच पटलं नाही. मग त्यामागं शिवाची वागणूक असो, त्याचे विचार असो वा त्याचा आत्याबाईंना असलेला पाठिंबा असो. शिवालादेखील सिध्दी एक क्षण देखील समोर सहन होत नाही. पण हळूहळू मात्र या दोघांचं नातं बदलू लागलं.

शिवाचं कधी सिध्दीला कधी तिच्या घरच्यांना मदत करणं, तिची काळजी घेणं, सिध्दीसाठी शिवाचं आईच्या विरोधात जाणं या सगळ्या गोष्टींमुळं सिध्दीला कुठेतरी आता शिवाबद्दल आपुलकी, प्रेम वाटू लागलं आहे. पण शिवाच्या मनामध्ये नक्की काय आहे? त्यालासुध्दा सिध्दीबद्दल आपुलकी वाटते आहे का? हे लवकरच कळेल. शिवा सिध्दीमागं नेहेमीच खंबीरपणं उभा राहिला आहे, वारंवार आलेल्या अडचणीमधून त्यानं सिध्दीला बाहेर काढलं आहे, तर सिध्दीनं देखील शिवाच्या कुटुंबाची अगदी स्वत:च्या घरातील माणसांप्रमाणं काळजी घेतली आहे, त्यांना प्रेम दिलं आहे...

शिवाचं चांगलं वागणं हे फक्त पक्षकार्य आहे का? हा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही. कारण, जलवासोबत बोलत असताना शिवानं तशी कबुली दिली की, जे काही तो सिध्दीसोबत चांगलं वागत आहे ते निव्वळ आत्याबाईंना दिलेल्या शब्दाखातर. बाकी त्याच्या मनामध्ये सिध्दीबद्दल असे काही नाही... त्यामुळं आता भविष्यात या दोघांच्या नात्यात कोणतं वळण येणार ते आगामी भागांमध्ये पहायला मिळणार आहे.हेही वाचा -

'हा' सिनेमा पाहून हिरानींना आठवले जुने दिवस

अमृता खानविलकरचा 'मलंग' अंदाज पाहिला का?
संबंधित विषय
ताज्या बातम्या