मराठी चित्रपट 'वन्स मोअर'चे चित्रीकरण सुरू


SHARE

मुंबई - विष्णू मनोहर यांची निर्मिती असलेला मराठी चित्रपट 'वन्स मोअर' या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. फिल्म सिटी, मुंबई सोबत गोव्यातही चित्रीकरण करण्यात येणार आहे.

'वन्स मोअर' हा मराठीतील पहिलाच सिनेमा आहे ज्यात जास्तीत जास्त वीएफएक्स तसेच ग्राफिक्स वापरले जाणार आहेत. हा सिनेमा 'कर्म' या विषयावर भाष्य करणारा असल्याने 14व्या शतकातील काळ व वर्तमान काळ दाखविला जाणार आहे. सिनेमाची कथा लेखिका श्वेता बिडकर यांची आहे. अभिनेते नरेश बिडकर यांच्या दिग्दर्शनात 'वन्स मोअर'ची निर्मिती होत आहे. 

पं. अशोक पत्की यांचा मुलगा आशुतोष पत्की हा मराठी चित्रपट सृष्टीत मुख्य नायक म्हणून पदार्पण करत आहे. त्याला साथ देण्यासाठी आपल्या नृत्याने अवघ्या महाराष्ट्राचं मन जिंकणारी अभिनेत्री आणि नृत्यांगणा धनश्री पाटीलसुद्धा या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहे. 'वन्स मोअर'चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर या सिनेमाचे सह निर्माते असून त्यांचीही एक महत्त्वाची भूमिका या सिनेमात असणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, भारत गणेशपुरे, पौर्णिमा तळवलकर यांच्याही भूमिका असणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या