Advertisement

'सलमान सोसायटी’ तील चांडाळ चौकडी


'सलमान सोसायटी’ तील चांडाळ चौकडी
SHARES

आजच्या पिढीतील धडाकेबाज बालकलाकार आता एकाच फ्रेममध्ये दिसणार अाहेत. ‘रईस’मध्ये शाहरुख खानच्या बालपणीची भूमिका साकारणारा शुभम मोरे, ‘एलिझाबेथ एकादशी’ फेम पुष्कर लोणारकर, गौरव मोरे आणि विनायक पोतदार ही चांडाळ चौकडी ‘सलमान सोसायटी’ या आगामी मराठी सिनेमासाठी एकत्र आली आहे. ‘पढेगा इंडिया, तो बढेगा इंडिया…’ या टॅगलाईनने प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या सिनेमात शिक्षणाचा मुद्दा हाताळण्यात आला आहे.

या चौघांना सिनेमात एकत्र आणण्याची किमया दिग्दर्शक कैलाश पवार यांनी साधली आहे. चंद्रकांत पवार आणि रेखा जगताप हे निर्माते प्राजक्ता एंटरप्रायझेसच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करत आहेत. शुभमने ‘रईस’ व ‘अमरीका’ या हिंदी सिनेमांसोबतच ‘फास्टर फेणे’, ‘हाफ तिकीट’ या मराठी सिनेमामध्ये तसंच ‘अपसाईड डाऊन’ या इंग्रजी सिनेमामध्ये अभिनय केला आहे. पुष्करने ‘बाजी’, ‘चि. व चि.सौ.कां.’, ‘बाजी’, ‘फिरकी’ या मराठी सिनेमांमध्ये काम केलं असून, गौरवने बरेच मराठी शो आणि जाहिराती केल्या आहेत. विनायकच्या नावावर ‘हाफ तिकीट’, ‘ताजमहाल’ आणि ‘येरे येरे पैसा’ हे सिनेमे जमा आहेत.

वर्षाअखेरीस प्रदर्शित

‘सलमान सोसायटी’ चं चित्रीकरण सध्या वेगात सुरू आहे. तीन शेड्युलमध्ये हा सिनेमा पूर्ण करण्याची योजना आखण्यात आली आहे. यातील काही भाग मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या भागात शूट करण्यात येणार आहे. या वर्षाअखेरीस ‘सलमान सोसायटी’ प्रदर्शित करण्याचा निर्माता-दिग्दर्शकांचा मानस आहे.हेही वाचा -

सीमारेषेच्या पलिकडे न गेलेला षटकार

सरकारी योजनांचा बोलबाला 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा