Advertisement

‘एक सांगायचंय’मधून शुभवी लोकेश गुप्तेचं चित्रपटसृष्टीत पदार्पण!

चित्रपटातील पदार्पणाविषयी शुभवी म्हणाली की, चित्रपटात माझ्याच वयाच्या एका मुलीची भूमिका आहे, हे मला माहीत होत., पण बाबाला कधी सांगितलं नाही की, मला काम करायचं आहे. एके दिवशी अचानक बाबाच मला येऊन म्हणाला, ‘हाय इरा, कशीयेस? मग मी हसले, पण त्याने मला ऑडिशन द्यायला लावली.

‘एक सांगायचंय’मधून शुभवी लोकेश गुप्तेचं चित्रपटसृष्टीत पदार्पण!
SHARES

वडील लोकेश आणि आई चैत्राली यांच्या पावलावर पाऊल टाकत शुभवी लोकेश गुप्ते चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘एक सांगायचंय... Unsaid Harmony’ या चित्रपटातून शुभवीच्या अभिनयाचा प्रवास सुरू होत आहे. 


तगड्या कलाकारांसोबत पदार्पण

‘एक सांगायचंय... Unsaid Harmony’ या चित्रपटाद्वारे अभिनेता केके मेनन मराठी चित्रपटसृष्टीत दाखल होत आहे. त्याच्या जोडीला आहे अभिनेत्री राजेश्वरी सचदेव. आपल्या कल्पक अदाकारीच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या या दोन तगड्या कलाकारांसोबत शुभवीला रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय पद्मावती राव, मिलिंद फाटक, अजित भुरे, विनीत शर्मा, शाल्व किंजवडेकर, हर्षिता सोहल, विभव राजाध्यक्ष, अभिजित अमकर, सचिन साळवी आदी मराठीतील आघाडीच्या कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. 


आवड म्हणून काम 

चित्रपटातील पदार्पणाविषयी शुभवी म्हणाली की, चित्रपटात माझ्याच वयाच्या एका मुलीची भूमिका  आहे, हे मला माहीत होत., पण बाबाला कधी सांगितलं नाही की, मला काम करायचं आहे. एके दिवशी अचानक बाबाच मला येऊन म्हणाला, ‘हाय इरा, कशीयेस? मग मी हसले, पण त्याने मला ऑडिशन द्यायला लावली. ऑडिशननंतर माझी कार्यशाळा झाली. स्क्रीप्टचं टीमबरोबर वाचन झालं.

या सगळ्याचा मला चित्रीकरणावेळी फायदा झाला, तसंच सगळ्यांनीच खूप मदत केल्यामुळे मला पाहिल्यांदाच काम करत असल्यासारखं वाटलंच नाही. सध्या तरी आवड म्हणून काम करत आहे, पण पुढे जाऊन अभिनेत्री म्हणूनच काम करेन या विषयी आताच काही सांगता येणार नाही, असंही शुभवी म्हणाली.


संवेदनशील कथा

१६ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी ऑस्कर विजेत्या रेसूल पुकुट्टी यांनी ध्वनी आरेखन केलं आहे. पुष्पांक गावडेनं सिनेमॅटोग्राफी केली असून, गीतलेखन जितेंद्र जोशी, तर संगीत दिग्दर्शन शैलेंद्र बर्वेनं केलं आहे. दिग्दर्शनासोबतच लोकेशनेच या चित्रपटाचं लेखन आणि संकलनही केलं आहे. चैत्राली गुप्तेनं चित्रपटाच्या वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. नातेसंबंधांबाबतची एक अत्यंत संवेदनशील कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे.



हेही वाचा-

नवाजुद्दीन-आथिया खाणार ‘मोतीचूर’!

‘माझा अगडबम’मध्ये चमकणार ‘सैराट’ फेम तानाजी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा