'शूर आम्ही सरदार' 21 एप्रिलपासून चित्रपटगृहात !

  Mumbai
  'शूर आम्ही सरदार' 21 एप्रिलपासून चित्रपटगृहात !
  मुंबई  -  

  मुंबई - भारताबाहेर राहणाऱ्या मराठीजनांना मराठी चित्रपटाविषयी विशेष प्रेम आहे. त्या प्रेमातूनच निर्मिती, लेखन, अभिनय अशा माध्यमातून काही मराठीजन मराठी चित्रपटाशी जोडले जातात. ऑस्ट्रेलियास्थित गणेश लोके यांनी पुढाकार घेऊन दहशतवादावर आधारित शूर आम्ही सरदार हा चित्रपट केला आहे. 21 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  दहशतवादाविरोधात एकत्र आलेले तीन तरुण काय करतात, त्यांना दहशवादाविरोधात काम करण्यात यश येतं का? या आशयसूत्रावर हा चित्रपट आधारित आहे. दहशतवादासारखा संवेदनशील विषय मराठी चित्रपटात बऱ्याच काळानं हाताळण्यात आला आहे. गणेश लोके यांनी या चित्रपटात चौफेर जबाबदारी निभावली आहे. त्यांनी चित्रपटाचं लेखन, प्रमुख भूमिका, सहदिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. इंडो ऑस एंटरटेन्मेंट, झुमका फिल्म्स, सासा प्रॉडक्शनच्या डॉ. प्रज्ञा दुगल, श्वेता देशपांडे आणि गणेश लोके यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रकाश जाधव चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटात गणेश लोके यांच्यासह अभिनेते सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, संजय मोने, शंतनू मोघे असे अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

  गणेश लोके गेली 17 वर्षं ऑस्ट्रेलियात वास्तव्याला आहेत. उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. 2013 मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियन नागरिक म्हणून ऑस्ट्रेलियन फेडरल निवडणूकही लढवली होती. मराठी भाषा, मराठी चित्रपटावरील प्रेमापोटी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यापूर्वी त्यांनी अयुब खानची प्रमुख भूमिका असलेल्या सरफरोश या हिंदी देशभक्तीपर चित्रपटाचीही निर्मिती केली होती. 'चित्रपट निर्मिती ही पॅशन असून देशभक्ती जागृत करणारे चित्रपट करण्यात विशेष रस असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केलं. तरुणांनी समाजासाठी काहीतरी भरीव योगदान द्यावं यासाठी प्रोत्साहन देणं महत्त्वाचं वाटतं,' असंही लोके यांनी सांगितलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.