'श्यामच्या आई'ची हॅटट्रिक

  Dadar
  'श्यामच्या आई'ची हॅटट्रिक
  मुंबई  -  

  दादर - जल्लोष या राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शिवाजी मंदिर येथे बुधवारी संध्याकाळी जल्लोषात रंगली. या फेरीत एकूण सात एकांकिका दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये सिडनहॅम महाविद्यालयाच्या 'श्यामची आई' या एकांकिकेनं प्रथम क्रमांक पटकावला, तर दुसरा महर्षी दयानंद कॉलेजच्या 'दप्तर' या एकांकिकेला मिळाला. अनुभूती कल्याणच्या इन सर्च ऑफ या एकांकिकेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.

  विघ्नहर्ता, उत्तुंगपाठोपाठ आता श्यामची आई या एकांकिकेनं हॅटट्रिकसह विजय साजरा केलाय.
  या स्पर्धेचं यंदा पहिलंच वर्ष होतं. तरीही पुणे, गोवा ठाणे अशा विविध ठिकाणांहून 35 एकांकिका स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या, त्यातून झिरो बजेट प्रॉडक्शन डोंबिवलीची ओवी, अनुभूति कल्याणची इन सर्च ऑफ, सिडनहॅम कॉलेजची शामची आई, महर्षी दयानंद महाविद्यालयाची दप्तर, प्रयोग मुंबईची बूंदे, इंद्रधनुची विभवांतर आणि अकथ अशा सात एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या होत्या. अंतिम फेरीसाठी कुमार सोहनी, संतोष पवार परीक्षक होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.