Advertisement

न्यूड फोटो मॉर्फ केल्याचा रणवीर सिंगचा दावा

काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग एका न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला होता.

न्यूड फोटो मॉर्फ केल्याचा रणवीर सिंगचा दावा
SHARES

अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. रणवीरनं न्यूड फोटोशूट प्रकरणी पोलिसांसमोर जबाब नोंदवला आहे. यामध्ये त्यानं न्यूड फोटोशूटमधील एक फोटो हा मॉर्फ करण्यात आला आहे, असा दावा केला आहे.

फोटो जसा दाखवला आहे, तसा तो शूट केलेला नाव्हता, असं रणवीरनं पोलिसांना सांगितलं. न्यूड फोटोशूटबाबत सध्या पोलीस रणवीरची चौकशी करत आहेत. कारण त्याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती.

रणवीर सिंहनं पोलिसांना माहिती दिली की, सात फोटोचं एक कॉन्ट्रॅक्ट त्यानं एका मासिकासोबत केलं होतं. फोटोशूट झाल्यानंतर हे सात फोटो लगेच पब्लिश होणार नव्हते. पण त्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामधील एक फोटो हा मॉर्फ केलेला आहे.

रणवीरनुसार, कॉन्ट्रॅक्टमध्ये याची खबरदारी घेतली होती की, फोटोशूटमध्ये कोणतेही अश्लिल कृत्य किंवा कोणाच्या भावना या फोटोशूटमुळे दुखावल्या जाणार नाहीत. ज्या फोटोमुळे गुन्हा दाखल झाला, तो फोटो जसा दाखवला आहे, तसा तो शूट केलेला नव्हता तो मॉर्फ केलेला आहे, असंही रणवीरनं सांगितलं.

रणवीरनं नोंदवलेल्या या जबाबाची पोलीस पडताळणी करत आहे. रणवीर सिंह विरोधात न्यूड फोटोशूटप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रणवीरवर अश्‍लीलता पसरवण्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

रणवीर लवकरच रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सोबतच आलिया भट्ट देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे दिग्गज कलाकारदेखील या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.हेही वाचा

अभिनेता केआरकेला मुंबईत अटक, वादग्रस्त ट्विट प्रकरणी कारवाई

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा