Advertisement

वडील-मुलीच्या नात्याचं ‘शान’दार गीत!

वडील हे मुलीचे पहिले मित्र असल्याचं बोललं जातं. कारण मुली वडिलांना आपला आदर्श मानत असतात. वडील-मुलीच्या या सुंदर नात्याला डेडिकेट करणारं गाणं सुप्रसिध्द पार्श्वगायक शानने गायलं आहे.

वडील-मुलीच्या नात्याचं ‘शान’दार गीत!
SHARES

सोशल इश्यू आणि मानवी नातेसंबंधांवर आधारित गीतरचना नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. अशातच एखाद्या गीताला शानसारख्या ख्यातनाम गायकाचा शानदार आवाज लाभतो, तेव्हा त्या गीताबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचते. शानने नुकतंच वडील-मुलीच्या नात्यावर आधारित असलेलं एक गीत गायलं आहे.


नो स्मोकिंग पापा

वडील हे मुलीचे पहिले मित्र असल्याचं बोललं जातं. कारण मुली वडिलांना आपला आदर्श मानत असतात. वडील-मुलीच्या या सुंदर नात्याला डेडिकेट करणारं गाणं सुप्रसिध्द पार्श्वगायक शानने गायलं आहे. शानने गायलेलं ‘नो स्मोकिंग पापा…’ हे सुंदर गाणं १ जानेवारी २०१९ ला लाँच होणार आहे. व्हिडियो पॅलेसची प्रस्तुती असलेला डॉ. दीपा सुरेंद्र देसाई आणि अनुराज फास्टनर्स प्रा. लि. आणि एडलिब्स प्रॉडक्शन्सचं  हे गाणं प्रितीश कामतने लिहिलं आहे. 


शेवटी ट्विस्ट 

शानने गायलेलं हे गाणं मितेश-प्रितेशने संगीतबध्द केलं आहे. या गाण्याचा टिझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या गाण्याविषयी शान म्हणाला की,  मी नुकतंच हे गाणं पाहिलं आहे. हे गाणं जितकं सुरेल झालं आहे, तितकाच याचा व्हिडीओही छान झाला आहे. जेव्हा एखाद्या चांगल्या गाण्याचा तेवढाच सुंदर व्हिडीओ होतो, तेव्हा ते गाणं ऐकणं आणि पाहणंही खूप मजेदार बनतं. या गाण्याच्या शेवटी एक छान ट्विस्ट आहे, जो मला अत्यंत आवडला आहे. गाण्याच्या टिझरचा मला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. जेव्हा हे गाणं रिलीज होईल, तेव्हा रसिकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वासही शानने व्यक्त केला आहे.हेही वाचा - 

'मी पण सचिन' मध्ये झळकणार अभिजीत खांडकेकर

राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या 'धप्पा'चा फर्स्ट लुक
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा