Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

'मी पण सचिन' मध्ये झळकणार अभिजीत खांडकेकर

'मी पण सचिन' या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला. टीझर पाहून चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली असतानाच आता चित्रपटाचं नवीन पोस्टर आलं आहे. या पोस्टरमध्ये स्वप्नीलसोबत अभिजीत खांडकेकरही दिसणार आहे.

'मी पण सचिन' मध्ये झळकणार अभिजीत खांडकेकर
SHARES

सचिन हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभं राहतं क्रिकेट. असाच एक क्रिकेटशी निगडीत असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मी पण सचिन' असं शीर्षक असलेल्या या चित्रपटात 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेता अभिजीत खांडकेकरही दिसणार आहे.


आक्रमक हावभाव

'मी पण सचिन' या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला. टीझर पाहून चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली असतानाच आता चित्रपटाचं नवीन पोस्टर आलं आहे. या पोस्टरमध्ये स्वप्नीलसोबत अभिजीत खांडकेकरही दिसणार आहे. त्याच्या चेहऱ्यावरील आक्रमक हावभाव बघून ही भूमिकाही विशेष असणार, याचा आपण अंदाज बांधू शकतो. 


१ फेब्रुवारी प्रदर्शित 

आता अभिजीत या चित्रपटात नक्की कोणती भूमिका साकारत आहे, हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. खरं तर क्रिकेट आणि आयुष्याचा खूप जवळचा संबंध आहे. क्रिकेटमध्ये जसे शेवटच्या टप्प्यापर्यंत काही सांगता येत नाही, आयुष्यचंही अगदी तसंच असतं. क्रिकेट आणि आयुष्यातील हे साम्य दाखवणारा, प्रेम, नात्याची परिभाषा शिकवणारा आणि आपल्या स्वप्नांचा माग घेण्यास प्रवृत्त करणारा हा सिनेमा येत्या १ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 


जागतिक स्तरावर वितरण

या चित्रपटात स्वप्नील-अभिजीतसोबत प्रियदर्शन जाधवही आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित 'मी पण सचिन'  या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन श्रेयस जाधवने केलं आहे. इरॉस इंटरनेशनलद्वारे 'मी पण सचिन' या चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरणही केलं जाणार आहे.हेही वाचा - 

राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या 'धप्पा'चा फर्स्ट लुक

चाॅकलेट बाॅय बनला अंडरवर्ल्ड डॉन
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा