Advertisement

अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागाचे सर्वेक्षण

आयकर विभागाच्या या कारवाईनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांनी ही पाहणी नसून छापा असल्याचं म्हटलं आहे.

अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागाचे सर्वेक्षण
SHARES

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागानं सर्वेक्षण केलं आहे. अधिकाऱ्यांकडून सोनू सूदच्या कार्यालयाची पाहणी केली जात आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. 

सुत्रांनी उघड केलं आहे की, आयकर विभागानं विभागानं सोनूच्या मालमत्तेचं सर्वेक्षण केलं.  सोनू सूदच्या एका प्रॉपर्टीच्या अकाउंट बुकमध्ये अनियमिततेचा आरोप झाल्यानंतर टीम प्रॉपर्टीचे सर्वेक्षण करत आहे. अहवालांनुसार, आयटी विभागानं सोनू आणि त्याच्या कंपन्यांशी संबंधित सहा ठिकाणांचे सर्वेक्षण केलं आहे.

आयकर विभागाच्या या कारवाईनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांनी ही पाहणी नसून छापा असल्याचं म्हटलं आहे. तर यावर काहींनी नाराजी व्यक्त करत भाजपावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. 

सोनू सूदची नुकतीच दिल्ली सरकारच्या शाळकरी विद्यार्थीसाठीच्या अभियानासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतरच काही दिवसांतच आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे, अशी चर्चा देखील जोर धरत आहे.

दिल्ली कार्यक्रमात सोनू सूदला राजकारणात प्रवेश करण्याच्या दृष्टीनं भेट झाल्यासंबंधी विचारण्यात आलं होतं. तेव्हा त्यानं आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं सांगितलं होतं. आम आदमी पक्षातील नेत्यांच्या भेटीनंतर सोनू सूद राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.

४८ वर्षीय सोनू सूद खऱ्या अर्थानं लॉकडाउनमुळे जास्त चर्चेत आला. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या अनेक परप्रांतीयांना सोनू सूदनं त्यांच्या घऱी पोहोचवण्याचं काम केलं. इतकंच नाही तर अनेकांच्या जेवणासोबत राहण्याची, रोजगाराचीही त्याने व्यवस्था केली.

लॉकडाउन काळात केलेल्या समाजकार्यामुळे सोनू सूदवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे त्याला राजकीय रंगही दिला जात होता. यामुळे त्याच्या राजकारणातील चर्चाही रंगल्या होत्या. मात्र सोनू सूदने नेहमीच या चर्चा अफवा असल्याचं सांगितलं आहे.


हेही वाचा

अभिनेता रजत बेदीच्या कारच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू

थिएटरसोबतच अमेझॉन, नेटफ्लिक्सवर रिलीज होणार कंगनाचा थलायवी, ५५ कोटीत करार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा