Advertisement

वझे महाविद्यालयात मंथन- जागर मराठीचा !


वझे महाविद्यालयात मंथन- जागर मराठीचा !
SHARES

मुलुंड - व्ही. जी. वझे महाविद्यालय पुरस्कृत मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळानं 'मंथन-जागर मराठीचा..!' या खास कार्यक्रमाचं शुक्रवारी आयोजन केलं होतं. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अभिनेता शरद पोंक्षे होते.
आजच्या जगात मराठी ही एक बोलीभाषा म्हणून परिचित आहे. मराठी भाषेची संस्कृती , परंपरा, तिची विविध अंगं तसंच मराठी भाषेचं जगाच्या पाठीवरचं स्थान विविध स्पर्धांद्वारे आजच्या पिढीला कळावं, म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. नृत्य तसंच गायन स्पर्धा, मराठी तुमची आमची- चर्चा फेरी , लघुनाट्य तसंच भाषण आणि कीर्तन अशा अनेक स्पर्धा झाल्या. अनेक शाळां तसंच महाविद्यालयांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. '52 अक्षरं असलेली ही मराठी भाषा आहे. जगात कोणतीच भाषा इतकी समृद्ध नाही. आणि इंग्रजी तर नाहीच नाही. तेव्हा मराठीचा सार्थ अभिमान बाळगा,' अशी भावना अभिनेता शरद पोंक्षे यांनी या वेळी व्यक्त केली. शनिवारीही दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा