SHARE

मुंबई - व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर काही खास जोड्या येणार आहेत. या व्हॅलेंटाईन डे च्या स्पेशल भागात चिन्मय उदगीरकर, संकर्षण कऱ्हाडे आणि अभिजीत खांडकेकर हे अभिनेते सपत्निक हजर राहणार आहेत. खरं तर या तिघांचं आणि डॉ. निलेश साबळेचं एक खास कनेक्शन आहे, ते म्हणजे हे सर्व कलाकार झी मराठीच्या 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या टॅलेंट हंट शो मधून नावारुपास आले. हा कार्यक्रम करतानाच्या अनेक गंमतीदार आठवणी आणि काही धम्माल किस्सेही आहेत जे या भागामधून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या