'होली के रंग'..एक संगीत मैफिल!


SHARE

माटुंगा - शाश्वतसूर आणि कर्नाटक संघ (कला भारती) यांच्या वतीने होळीनिमित्त 'होली के रंग' हा शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा कार्यक्रम माटुंगा (प.) कर्नाटक संघाच्या सभागृहात आयोजित केला गेला. या वेळी रश्मी पराडकर-सुळे आणि डॉ. राम देशपांडे, यति भागवत (तबला) आणि सिद्धेश बिचोलकर यांनी साथ दिली. कर्नाटक संघ (कला भारती) गेली अनेक वर्ष असे संगीतातील कार्यक्रम राबवत आहे. तर, गेल्या 2 वर्षांपासून शाश्वतसूर यांच्याशी संलग्न कार्यक्रमही येथे आयोजित केले जातात. या कार्यक्रमाला श्रोत्यांचाही उत्तम प्रतिसाद लाभला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या