तुम्ही पाहिले का नेहाचे 'रॉयल' फोटो ?

 Mumbai
तुम्ही पाहिले का नेहाचे 'रॉयल' फोटो ?
Mumbai  -  

हल्ली सेलिब्रिटींचं फोटोशूट फक्त सिनेमांपुरतंच मर्यादित राहील नाहीये तर ते अगदी कधीही  ते फोटोशूट करताना पाहायला मिळतात. सौंदर्य आणि अभिनय क्षमतेच्या जोरावर मराठी सिनेजगतात आपली विशेष ओळख निर्माण करणारी नेहा महाजन या अभिनेत्रीने नुकताच एक हटके फोटोशुट केलं आहे.


       

गडद निळ्या रंगाचा गाऊन परिधान केलेल्या या फोटोशुटमध्ये नेहाचं व्यक्तिमत्व अधिक उठावदार दिसत असून, नेहाचा हा 'रॉयल' लूक तिच्या चाहत्यांसाठी देखील विशेष ठरत आहे.

आत्तापर्यंत विविधांगी भूमिकेतून लोकांसमोर आलेल्या नेहाच्या या रॉयल फोटोशुटला सोशल साईटवर भरभरून प्रतिसाद देखील मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Loading Comments