‘स्पायकर द कल्चर’ची धमाकेदार सुरुवात

घाटकोपर - ‘स्पायकर द कल्चर 2016’ची रविवार फिनिक्स मॉलमध्ये धमाकेदार सुरुवात झाली. स्पायकर द कल्चरमध्ये परदेशांतील स्पर्धकांनीही सहभाग घेतलाय. यामध्ये 500 स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी दोन परिक्षकांना परदेशातून आमंत्रित केलं आहे. यात बांग्लादेश, इंडोनेशिया, दुबई आणि नेपाळहून आलेल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. ज्याची एक शानदार झलक रविवार फिनिक्स मॉलमध्ये पाहायला मिळाली. या वेळी स्पर्धकांनी अपल्या नृत्य कलेचं जोरदार प्रदर्शन केलं. कार्यक्रमात एकाच मंचावर भारतीय आणि विदेशी कलाकारांनी आपला कलाविष्कार सादर केला.

Loading Comments