Advertisement

'नकळत सारे घडले'मध्ये बदलणार नेहाचा लूक


'नकळत सारे घडले'मध्ये बदलणार नेहाचा लूक
SHARES

स्टार प्रवाहच्या 'नकळत सारे घडले' या मालिकेतली नेहा, अर्थात नुपूर परुळेकर आता नव्या लूकमध्ये दिसणार आहे. डॉक्टर असलेली नेहा आता प्रॅक्टिस करताना दिसणार आहे. त्यामुळे अर्थातच तिचा वेगळा लूक प्रेक्षकांसमोर येणार आहे.


पुढील भागात काय?

छोट्या परीला वेळ देण्यासाठी नेहानं आपली मेडिकलची प्रॅक्टिस सोडली होती. आता पुन्हा प्रॅक्टिस करावी, स्वत:चं क्लिनिक सुरू करावं, असं प्रताप नेहाला सुचवतो. प्रॅक्टिस सुरू करताना साडी ऐवजी छान पंजाबी ड्रेस घालत जा, असं छोटी परी नेहाला सांगते. प्रताप आणि परीच्या आयडियाला घरच्यांकडूनही पाठिंबा मिळतो. त्यामुळे नेहा उत्साहानं, नव्या लूकमध्ये पुन्हा प्रॅक्टिस सुरू करण्याचा निर्णय घेते. लग्नानंतर प्रॅक्टिसपासून दूर गेलेली, परीच्या संगोपनात रमलेली डॉ. नेहा पुन्हा क्लिनिकमध्ये येणार आहे. नेहाचा हा निर्णय तिच्यासाठी नवी सुरुवात ठरेल का, याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच लागून राहिली असेल.


नेहाची भूमिका साकारणारी नुपूर परूळेकर आपल्या नव्या लुकविषयी म्हणते 'हा नवा लूक मिळणं ही माझ्यासाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. मला हा लूक आवडला. कॅरी करायला सोपा असा हा लूक आहे. या लूकमुळे परीची इच्छाही पूर्ण झाली. बदललेल्या लुकबरोबरच नेहाला ही व्यक्तिरेखाही वेगळ्या पद्धतीनं साकारता येणार आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार, नेहाचा
प्रवास कसा असेल याविषयी माझ्याही मनात कुतूहल आहे
'.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा