Advertisement

खरी 'धक धक' गर्ल कोण? माधुरी की श्रीदेवी?


खरी 'धक धक' गर्ल कोण? माधुरी की श्रीदेवी?
SHARES

मुंबई - काही गाणी अशी असतात ज्या गाण्याला किती ही वर्ष झाली तरीही कित्येक वर्ष आपल्या डोक्यातून जात नाही. अगदी कधीही ते गाणे ऐकले तरी ते तितकेच आवडीचे वाटते. असंच आहे माधुरी दीक्षितवर चित्रित झालेल्या' धक धक' गाण्याचं. आज हे गाणे येऊन तब्बल २५ वर्ष झाली आहेत. ३ एप्रिल १९९२ या दिवशी 'बेटा' हा सिनेमा रिलीज झाला आणि याच सिनेमात 'धक धक' हे गाणं माधुरी दीक्षितवर चित्रित करण्यात आलं. त्या दिवसापासून माधुरीची ओळख 'धक धक गर्ल' अशीच झाली.
या गाण्याने प्रेक्षकांवर अशी काही जादू केली की आज २५ वर्षांनंतरही ते गाणे प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान टिकवून आहे आणि अजून २५ वर्षांनंतरही राहील यात शंका नाही.


श्रीदेवीच्या 'काटे नहीं कटते' या गाण्याला टक्कर देण्यासाठी 'धक धक' हे गाणं बनवण्यात आल्याचं बोललं जातं. १९८७ मध्ये मिस्टर इंडिया हा सिनेमा आला आणि त्यातलं 'काटे नहीं कटते' हे गाणं चांगलंच गाजलं. 'बेटा' या सिनेमासाठी इंद्र कुमार यांनी श्रीदेवीला विचारणी केली होती. परंतु तिने या सिनेमाला नकार दिला. म्हणून 'मिस्टर इंडिया' सिनेमातील 'काटे नहीं कटते' या गाण्याला टक्कर देणारे गाणे 'बेटा' या सिनेमात असावे, असा आग्रह इंद्र कुमार यांनी धरला. गीतकार समीर यांच्याकडे इंद्र कुमार यांनी हट्ट धरला की मिस्टर इंडियातील गाण्याला टक्कर देणारे गाणे तुम्ही तयार करा. तसेच इंद्र कुमार यांच्या डोक्यात एका दाक्षिणात्य सिनेमातील गाण्याची धून होती. त्यानुसार तमिळ चित्रपटातील 'अब्बा नी तियानी' या इलैयाराजा यांच्या संगीतावर आधारीत धक-धक गर्ल हे गाणं जन्माला आलं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा