Advertisement

... तर सुबोध बनणार राहुल गांधी?


... तर सुबोध बनणार राहुल गांधी?
SHARES

सध्या सगळीकडं लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित असलेला सिनेमा कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. यातच सुबोध भावेसारखा सर्जनशील अभिनेता राहुल गांधी बनणार असल्याची बातमी आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत!


प्रकरण काहीसं वेगळंच

होय, पुण्यात असंच काहीसं घडलं आणि ही बातमी इतरत्र पसरेपर्यंत सुबोध भावे आता राहुल गांधींच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली. सुरुवातीला राहुल गांधीच्या बायोपीकमध्ये सुबोध त्यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात होतं. नंतर एका मुलानं सुबोधला प्रश्न विचाऱल्यावर राहुल गांधींवर सिनेमा आला आणि जर कोणी अशी स्क्रिप्ट घेऊन माझ्याकडं आलं आणि ती मला योग्य वाटली तर मी नक्की विचार करीन असं सुबोध म्हणाल्याचं बोललं गेलं, पण खरं प्रकरण काहीसं वेगळंच होतं.


राहुल गांधींसारखा दिसतो

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील लक्ष्मी लॉन्स मगरपट्टा येथील कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी केली. यावेळी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. तिथंच हा सर्व प्रकार थट्टा-मस्करीत घडला. सुरुवातीला सुबोध म्हणाला की, एक अभिनेता म्हणून मी अनेकांचे बायोपिक केले आहेत. लोकमान्य टिळकांच्या जीवनावरही बायोपिक केला आहे. मला अनेक लोकांनी सांगितलं की, मी राहुल गांधी यांच्यासारखा दिसतो. मग मी विचार केला की, राहुल गांधी यांचा बायोपिक मी का करु नये? 


एकच हशा

त्यावर राहुलही सुबोधला म्हणाले की, याचं उलटही होऊ शकतं. मी तुझ्यासारखा दिसतो. त्यावर सुबोध म्हणाला की, आपण एक काम करूया. तुम्ही माझ्या बायोपीकमध्ये काम करा आणि मी तुमचा बायोपीक करतो. त्यामुळंच जर मला तुमचा बायोपीक करायचा असेल तर मला तुमच्याबाबत जाणून घ्यावं लागेल असं म्हणत सुबोधनं अगदी हसतखेळत राहुल यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. हा सर्व प्रकार खूपच गंमतीत घडला आणि एकच हशा पिकला.


चित्रपटांच्या कामात व्यग्र

असो, हा झाला गंमतीचा भाग, पण भविष्यात जर राहुल गांधी यांचा बायोपीक तयार करायचं ठरलं, तर त्यासाठी सुबोध भावेची वर्णी लागू शकते हे मात्र नक्की. सुबोधबाबत बोलायचं तर सध्या त्याची 'तुला पाहते रे' ही मालिका एका वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे. यासोबतच तो इतरही काही आगामी चित्रपटांच्या कामात व्यग्र आहे. अशातच भविष्यात त्याला राहुल गांधींच्या सिनेमाचीही आॅफर आली तर नवल वाटू नये.हेही वाचा -

मोफत पहा 'आमच्या 'ही'चं प्रकरण'!

'मोदी : जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' १० भागांची मालिका
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा