सनी पवारवर राजकीय वर्तुळातून कौतुकांचा वर्षाव

 Mumbai
सनी पवारवर राजकीय वर्तुळातून कौतुकांचा वर्षाव

मुंबई - लायन चित्रपटामध्ये लहान मुलाची भूमिका करणारा सनी पवार सध्या प्रसिद्धी झोतात आहे. अमेरिकेहून आल्यापासून सनी पवारवर राजकीय वर्तुळातूनही कौतुकांचा वर्षाव होत आहे. बुधवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट सनी आणि त्याच्या कुटुंबियांनी घेतली. तर गुरुवारी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट यशवंतराव चव्हाण केंद्रात घेतली. राष्ट्रवादी पक्षाच्या एका नेत्याने या भेटीसाठी सनी पवार आणि त्याच्या परिवाराला खास गाडी पाठवली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही बोलावणे येण्याची शक्यता आहे. तर पुढच्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही सनी पवारला भेटण्यासाठी बोलावण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळातून सनी पवारसाठी रेड कार्पेट अंथरले जात असताना बॉलिवूडमधून मात्र सनी पवारचे अद्याप कौतूक झालेलं नाही.

Loading Comments