Advertisement

स्वप्निल जोशी पुन्हा झाला बाबा


स्वप्निल जोशी पुन्हा झाला बाबा
SHARES

तरुणींचा आवडता अभिनेता स्वप्निल जोशी पुन्हा एकदा बाबा झाला आहे. स्वप्निलची पत्नी लीना हीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आपण दुसऱ्यांदा बाबा झाल्याबद्दल स्वप्निल चांगलाच खूश झाला आहे. स्वप्निलला एक मुलगीदेखील आहे.लग्नाच्या वाढदिवसाआधीच मिळालं गिफ्ट

आपल्या अभिनय कौशल्यानं त्यानं प्रेक्षकांना अल्पावधीतच आपलेसं केलं आहे. स्वप्निल आणि लीना यांचं लग्न १६ डिसेंबर २०११ मध्ये झालं होतं. त्यामुळं यंदा स्वप्निलला लग्नाच्या वाढदिवसाआधीच छानसं गिफ्ट मिळालं आहे.

मूळची औरंगाबादची असणारी लीना ही व्यवसायानं डेन्टिस्ट आहे. या दाम्पत्याला मायरा नावाची मुलगी आहे. मायरा आता दीड वर्षांची झाली आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे सध्या संपूर्ण जोशी कुटुंब आनंदात आहे.मराठी चित्रपटसृष्टीतही स्वप्नील सुपरस्टार

स्वप्नीलने कृष्णा या मालिकेत साकारलेली कृष्णाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. स्वप्नीलनं उत्तर रामायण, हद कर दी आपने, दिल विल प्यार व्यार, देस में निकला होगा चाँद, अमानत, एका लग्नाची तिसरी गोष्ट अशा मालिकांमधून आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. गुलाम-ए-मुस्तफा या चित्रपटात स्वप्नीलनं साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. हिंदी चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतही स्वप्नील सुपरस्टार झाला. दुनियादारी, मुंबई पुणे मुंबई, भिकारी यांसारखे अनेक हिट चित्रपट स्वप्निलनं दिले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा