Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

'तारक मेहता का उल्टा चष्मा' पाहूून खुष झाला आयसीयूतला पेशंट

सध्या रुग्णालयातील एक फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोत तारक मेहता मालिका पाहून पेशंट कसा खुष झाला हे दिसत आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' पाहूून खुष झाला आयसीयूतला पेशंट
SHARES

कोरोना व्हायरसमुळे देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे मनोरंजन क्षेत्रातही मालिका, चित्रपटांचे शूटिंग बंद आहे. याकाळात जुन्या मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहेत. सुप्रसिद्ध मालिका तारक मेहता... (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका देखील पुन्हा दाखवली जात आहे. आता या मालिकेवर प्रेक्षकांचा किती जीव आहे? याचचं उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं.

सध्या रुग्णालयातील एक फोटो खूप व्हायरल होत आहे. अक्षय माटुर या नावाच्या व्यक्तीनं हा फोटो पहिला फेसबुकवर शेअर केला. यामध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा पाहून आयसीयूमध्ये उपचार घेत असलेला रुग्ण हसताना दिसत आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा या हिंदी मालिकेचा फॅन असलेली व्यक्ती ब्रेन स्ट्रोकमुळे रुग्णालयात होती. अक्षय माथुर हा या व्यक्तीचा मुलगा आहे. त्यांनी मुलाला आयसीयूमध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा लावण्यास सांगितलं. टीव्ही लावल्यानंतर वडिल मालिका पाहत असतानाचा फोटो अक्षयनं टिपला आणि शेअर केला. मग काय फोटो सगळीकडे व्हायरल झाला.

अक्षयनं पोस्टमध्ये म्हटलं की, जेठालाल आणि दया बेन स्क्रीनवर दिसताच वडिल हसत आहेत. वडिल ब्रेन स्ट्रोकच्या आजारानं त्रस्त आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते आयसीयूमध्ये असून त्यांनी पहिल्यांदा एक मागणी केली की वॉर्डमध्ये शिफ्ट झाल्यानंतर आधी तारक मेहता का उल्टा चश्मा लाव. ते शिफ्ट झाले तेव्हा तारक मेहता का उल्टा चश्मा लावताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर याची माहिती निर्मात्यापर्यंत पोहोचली. प्रोड्युसर असित कुमार मोदी यांनीही या फॅनच्या प्रेमासाठी आभार मानले आहेत.

तारक मेहता का उल्टा चश्मा गेल्या 12 वर्षांपासून सुरू आहे. सध्या शोचे शूटिंग बंद आहे. लॉकडाऊनच्या काळात हे कलाकार सोशल मीडियावरून फॅन्ससोबत संवाद साधत आहेत.      Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा