‘दंगल’चा एक्झिट पोल

मुंबई - अामीर खानचा 'दंगल' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हरियाणाचे कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गीता आणि बबिता फोगट यांच्या जीवनावर आधारित 'दंगल' हा एक बायोपिक सिनेमा आहे. पहिल्याचं दिवशी आमीरच्या दंगलनं बॉक्स ऑफिसवर दंगल माजवलीय. प्रेक्षकांनी आमीरच्या 'दंगल'ला भरभरून प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. ख्रिसमसमध्ये रिलीज होणारा 'दंगल' हा आमीर खानचा पहिला सिनेमा नसून, याआधीही त्याचे ख्रिसमसमध्ये 'थ्री इडियट्स', 'तारे जमीन पर', 'गजनी', 'धूम 3', 'पीके' सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे प्रदर्शित झालेत. या चित्रपटांना भरभरुन प्रतिसाद आणि यश मिळालं. आता 'दंगल'ही बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड बनवेल असं आमीरच्या चाहत्यांना वाटतंय.

Loading Comments