Advertisement

'चला हवा येऊ द्या'ची विश्व भरारी


'चला हवा येऊ द्या'ची विश्व भरारी
SHARES

तमाम मराठी प्रेक्षकांना दर सोमवारी आणि मंगळवारी जो प्रश्न ऐकायची सवयच लागलीये तो प्रश्न म्हणजे हसताय ना? हसायलाच पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्नच ऐकायला मिळत नसल्याने प्रेक्षक उदास होते. पण आता प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचं हे वादळ परत येत आहे.


'चला हवा येऊ द्या'चा विश्वदौरा

‘जिथे मराठी तिथे झी मराठी’ हे ब्रीद घेऊन 'चला हवा येऊ द्या'चा विश्वदौरा पुन्हा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी मराठीने या विश्व दौऱ्याच्या निमित्ताने जगाच्या नकाशावर एक धाडसी पाऊल टाकलं आहे. येत्या ८ जानेवारीपासून 'चला हवा येऊ द्या'चा विश्वदौरा सुरू होत आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर येणाऱ्या या विश्वदौऱ्यात 'चला हवा येऊ द्या'ची टीम आपल्यासोबत प्रेक्षकांना जगाची सफर घडवणार आहे. 'चला हवा येऊ द्या'ने आतापर्यंत लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. 'चला हवा येऊ द्या'मधील पोस्टमन काका, शांताबाई, जज, वकील, मामा भाचे, वादघाले सासू सून, पुणेरी बाई अशी वेगवेगळी पात्र आपल्या जगण्याचा भाग बनली आहेत.


८ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या 'चला हवा येऊ द्या' विश्वदौऱ्याचं पहिलं स्टेशन दुबई आणि अबुधाबी आहे. यामध्ये कॉमेडीची आतषबाजी तर होणारच आहे, शिवाय बॉलिवूड पार्क, फेरारी वर्ल्ड अशा अनेक ठिकाणांची सफर ही टीम प्रेक्षकांना घडवणार आहेत. चला हवा येऊ द्याच्या कलाकारांसोबत दुबई अबुधाबी दौऱ्यात खास पाहुणी म्हणून जाडूबाईची टीम अर्थात निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे दुबई अबुधाबी दौऱ्यात खास पाहुणी म्हणून येत आहे...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा