Coronavirus cases in Maharashtra: 194Mumbai: 77Islampur Sangli: 25Pune: 20Pimpri Chinchwad: 12Nagpur: 12Kalyan: 7Navi Mumbai: 6Thane: 5Yavatmal: 4Vasai-Virar: 4Ahmednagar: 3Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Palghar: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 6Total Discharged: 28BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

स्वातंत्र्यवीरांच्या रूपात मराठी स्टार्स!

मराठमोळा छायाचित्रकार तेजस नेरुरकरने 'वंदे मातरम् २०१९' या थीमअंतर्गत एक खास कॅलेंडर तयार केलं आहे. या कॅलेंडरमध्ये मराठी कलाकारांची ऐतिहासिक रूपं पाहायला मिळणार आहेत.

स्वातंत्र्यवीरांच्या रूपात मराठी स्टार्स!
SHARE

रुपेरी पडद्यावरील कलाकारांना आपण नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहात असतो. कधी मॅाडर्न रूपात, तर कधी ऐतिहासिक भूमिकांमध्ये. काही कलाकारांनी ऐतिहासिक भूमिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यश मिळवलं असलं तरी फार कमी कलाकारांना ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी लाभते. पण आता मराठी सिनेसृष्टीतील तब्बल २६ कलाकार स्वातंत्र्यवीरांच्या रूपात भेटणार आहेत.


आगळवेगळं कॅलेंडर

या कलाकारांनी कोणत्याही सिनेमा किंवा मालिकेसाठी क्रांतीकारकांचा वेष धारण केलेला नाही हे विशेष. मराठीतील २६ कलाकारांनी एका कॅलेंडरच्या माध्यमातून भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी झगडणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना मानाचा मुजरा केला आहे. मराठमोळा छायाचित्रकार तेजस नेरुरकरने 'वंदे मातरम् २०१९' या थीमअंतर्गत एक खास कॅलेंडर तयार केलं आहे. या कॅलेंडरमध्ये मराठी कलाकारांची ऐतिहासिक रूपं पाहायला मिळणार आहेत.


अविनाश गोवारीकरांच्या हस्ते कॅलेंडरचं अनावरण

प्रसिद्ध बॅालिवुड छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांच्या हस्ते तेजसच्या 'वंदे मातरम् २०१९' या कॅलेंडरचं अनावरण करण्यात आलं. याप्रसंगी शरद केळकर, प्रिया बापट, उमेश कामत, सौरभ गोखले, पूजा सावंत आणि आदिनाथ कोठारे हे कलाकार उपस्थित होते. गायिका सायली पंकजने गायलेल्या 'वंदे मातरम्' या गीतासोबतच दीप प्रज्ज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. गोवारीकर यांनी तेजसच्या अनोख्या संकल्पनेचं भरभरून कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कॅलेडरमधील फोटोंची एक छोटी व्हिडीओ क्लीपही यावेळी दाखवण्यात आली.


२६ कलाकर झळकले कॅलेंडरवर

मराठी सिनेसृष्टीतील २६ कलाकारांचा सहभाग यंदाच्या या कॅलेंडरमध्ये आहे. शरद केळकर, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, प्रवीण तरडे, सुनिल बर्वे, सागर देशमुख, डॉ. अमोल कोल्हे, आदिनाथ कोठारे, प्रियदर्शन जाधव, अमेय वाघ, ललित प्रभाकर, अक्षय टांकसाळे, सोनाली कुलकर्णी, प्रिया बापट, श्रिया पिळगावकर, प्राजक्ता माळी, सई ताम्हणकर, नेहा महाजन, प्रियांका बर्वे, पूजा सावंत, उर्मिला कानिटकर, श्रेया बुगडे, ऋता दुर्गुळे, तेजश्री प्रधान, स्पृहा जोशी या कलाकारांना तेजसने स्वातंत्र्यवीरांच्या गेटअपमध्ये आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.


सावरकरांना मानवंदना

आपल्याला हे स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून मिळालं आहे. त्यांच्या त्या त्यागाची परतफेड आपल्याकडून होणं केवळ अशक्यच आहे, पण त्यांची आठवण अंतर्मनात कुठल्या ना कुठल्या रूपात दृढ राहावी या धारणेतून या कॅलेंडरची संकल्पना प्रत्यक्षात आल्याचं तेजसने कॅलेंडरमागील हेतू स्पष्ट करताना सांगितलं. केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी असे दिवस सोडल्यास त्या हुतात्म्यांची आठवण क्वचितच होते, अथवा होते का? या स्वत:लाच विचारलेल्या प्रश्नातून मिळालेल्या उत्तरातून स्वातंत्र्यवीरांना मानवंदना देत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी यंदाचं कॅलेंडर 'वंदे मातरम् २०१९' या थीमवर प्रकाशित करण्यात आल्याचंही तेजसने सांगितलं.


हेही वाचा -

संदीपने काढलं 'डोंबिवली रिटर्न' तिकीट!

...जेव्हा उद्धवनाही 'ठाकरे'च्या गाण्यावर नाचावसं वाटतं !संबंधित विषय
ताज्या बातम्या