...जेव्हा उद्धवनाही 'ठाकरे'च्या गाण्यावर नाचावसं वाटतं !

‘ठाकरे’ या चित्रपटातील ‘आया रे आया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे…’, एक थीम साँग आणि मराठी चित्रपटातील ‘कोण आला रे कोण आला…’ ही गाणी लाँच करण्यात आली.

  • ...जेव्हा उद्धवनाही 'ठाकरे'च्या गाण्यावर नाचावसं वाटतं !
  • ...जेव्हा उद्धवनाही 'ठाकरे'च्या गाण्यावर नाचावसं वाटतं !
  • ...जेव्हा उद्धवनाही 'ठाकरे'च्या गाण्यावर नाचावसं वाटतं !
SHARE

बाळासाहेबांचं व्यक्तिमत्त्व मैदानावरील होतं. त्यामुळे बाळासाहेबांवर आधारित असलेल्या ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्याला मिळालेली ही दाद हॉटेलच्या चार भिंतीत मावणारी नसल्याचं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. मुंबईतील ताज लँड्स एंड या पंचतारांकीत हॉटेलमध्ये ढोल, ताशे आणि लेझिमच्या निनादात ‘ठाकरे’ सिनेमाचं संगीत प्रकाशन करण्यात आलं. त्याप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते.


जिओ और जीने दो

‘ठाकरे’ सिनेमातील गाणी जेव्हा सर्वप्रथम ऐकली, तेव्हा मनसोक्त नाचावंसं वाटल्याचं प्रतिपादनही उद्धव यांनी केलं. तर चित्रपटाचे निर्माते खासदार संजय राऊत यांनी ‘ठाकरे सब का बाप है’ असं म्हणत बाळासाहेबांनी दिलेल्या ‘जिओ और जीने दो’ या जीवनमंत्राची आठवण करून दिली. ते म्हणाले की, बाळासाहेबांनी नेहमी 'तुम्हीही जगा आणि आम्हालाही जगू द्या' असं म्हटलं आहे. त्यामुळेच नवाजुद्दीन सिद्दीकी या अभिनेत्याने बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारणं ही त्यांचीच आयडीओलॉजी मांडणारं असल्याचं वाटतं. ठाकरेंवरील मुख्य गाणं नकाश अझीझ यांनी गायलं आहे. त्यामुळे या चित्रपटातून बाळासाहेबांचं खरं व्यक्तिमत्त्व समोर येईल यात शंका नसल्याचंही राऊत म्हणाले.


गाणी लाँच

या सोहळ्यात ‘ठाकरे’ या चित्रपटातील ‘आया रे आया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे…’, एक थीम साँग आणि मराठी चित्रपटातील ‘कोण आला रे कोण आला…’ ही गाणी लाँच करण्यात आली. बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारताना खूप प्रेशर होतं, पण संजय राऊत आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर सोपं झाल्याचं नवाजुद्दीन म्हणाला. मी आजवर स्वत:च्या जीवनाचा जितका अभ्यास केला नाही तितका बाळासाहेबांचा केल्याचं नवाजने सांगितलं.


वर्णनावरून साकारल्या मीनाताई

या चित्रपटात अमृता रावने मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. आपल्या अनुभवाबाबत बोलताना ती म्हणाली की, या चित्रपटात मी कुठेही अमृता वाटू नये याची काळजी घेतली आहे. सुरुवातीला भीती वाटत होती. कारण मीनाताईंबाबतचे व्हिडीओ किंवा त्यांच्याबाबतचं लिखाण उपलब्ध नाही. बाळासाहेबांच्या बहिणीने दिलेली एक मुलाखत माझ्या पाहण्यात आली. त्यांनी ज्या प्रकारे मीनाताईंचं वर्णन केलं आणि दिग्दर्शकांनी जे सांगितलं त्यातून माझ्या मनात मीनाताईंचं जे चित्र रेखाटलं गेलं तशा मीनाताई साकारण्याचा प्रयत्न केला आहे.


बाळासाहेबांची आरती

‘आया रे आया रे…’ या गाण्याला संगीत देणाऱ्या रोहन-रोहन या संगीतकारांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, हे गाणं म्हणजे बाळासाहेबांची आरती आहे. या चित्रपटातील प्रत्येक गाणं म्हणजे बाळासाहेबां बाबतची भावना आहे. ‘कोण आला रे कोण आला…’ अवधूत गुप्तेच्या म्हणण्यानुसार, 'हे गाणे गाण्याचा अनुभव अगदी वेगळा होता. गाणं रेकार्ड करताना बाळासाहेब आपल्या सोबतच असल्याचं जाणवत होतं.


अन्याय करणाऱ्यांची वाजवायचे

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘ठाकरे’तील गाण्यांबाबत बोलताना संगीतकार रोहन-रोहन यांचं तोंडभरून कौतुक केलं. ते म्हणाले की, रोहन-रोहन यांचा स्पीड रो-रो बोटीप्रमाणे आहे. आजाने (बाळासाहेब) संगीतात काहीतरी करावं असं माझ्या पणजोबांना (प्रबोधनकार) वाटत होतं. त्यासाठी त्यांनी आजांना वाद्यही आणून दिली होती. आजानी संगीतात काही केलं नाही, मात्र जे अन्याय करायचे त्यांची ते वाजवायचे.


हेही वाचा -

'ठाकरे' जुमानणार का सेन्सॅारचा आदेश?संबंधित विषय
ताज्या बातम्या