Advertisement

“राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, तेजस्विनीनं व्यक्त केला संताप

राज्य सरकार आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशा राजकारणावर अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं संताप व्यक्त केला आहे.

“राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, तेजस्विनीनं व्यक्त केला संताप
SHARES

कोरोना विषाणूचं (coronavirus) संक्रमण दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. या वाढत्या संक्रमाणामुळं सगळेच चिंतेत आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन आणि रेमडिसेवर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे.

यावरूनच राजकिय वर्तुळात सध्या घमासान सुरू आहे. राज्य सरकार आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशा राजकारणावर अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिनं संताप व्यक्त केला आहे. (Politics of India)

तेजस्विनीनं देशात सुरू असलेल्या राजकारणावर जोरदार टीका केली. इन्स्टावर तिनं “सगळ्यात मोठी “कीड” जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे “राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या “कीड”पासून बचाव करता आला तर बघा! ..अवघड आहे सगळंच…काळजी घ्या.” अशा रोखठोक शब्दात आपलं मत व्यक्त केलं आहे. तिची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, मुंबईत रविवारी ४६ हजार ९७१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ८२ टक्के इतका आहे. ११ एप्रिल ते १७ एप्रिलपर्यंत मुंबईचा विचार केला असता मुंबईत एकूण रुग्ण वाढीचा दर हा १.५३ टक्के इतका आहे.

मुंबईत १०० सक्रिय सीलबंद इमारती आहेत. त्याचप्रमाणे १ हजार १८८ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. मुंबईत आतापर्यंत ४९ लाख ४५ हजार ९७६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असली तरी मुंबईत कोरोनामुळं होणारे मृत्यू हे तुलनेने कमी आहेत.

मुंबईत आतापर्यंत १२ हजार ३४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणं मुंबईसह राज्यातही (maharashtra) ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईतही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत.

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मुंबईतील विविध ६ रुग्णालयातील १६८ रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी रुग्णांना पालिकेच्या इतर कोविड सेंटरमध्ये भरती करण्याचे काम करण्यात आले.



हेही वाचा

करण जोहरनं 'दोस्ताना २'मधून कार्तिक आर्यनला बाहेरचा रस्ता का दाखवला?

‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा