Advertisement

तारक मेहताच्या सेटवर कोरोनाचा उद्रेक, आणखी ४ कलाकार पॉझिटिव्ह

कोरोनाचा कहर आता तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka ooltah chashmah) या मालिकेतही पाहायला मिळत आहे.

तारक मेहताच्या सेटवर कोरोनाचा उद्रेक, आणखी ४ कलाकार पॉझिटिव्ह
SHARES

कोरोनाचा कहर आता तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka ooltah chashmah) या मालिकेतही पाहायला मिळत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या चार कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. (Coronavirus positive) सध्या घरातच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमानुसार मालिकेच्या सेटवर कोरोना चाचणी करणं बंधनकार आहे. यामुळं अगदी बॅकस्टेज आर्टिस्ट पासून पडद्यावर झळकणाऱ्या कलाकारांपर्यंत सर्वांना ही टेस्ट करावी लागते. त्यामुळं तारक मेहताच्या सेटवर ११० जणांची चाचणी घेण्यात आली होती.

धक्कादायक बाब म्हणजे यापैकी ४ जणांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. या रिपोर्टमुळं सध्या सेटवर चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या कलाकारांची नाव निर्मात्यांनी जाहीर केलेली नाहीत. मात्र यापुर्वी मंदार चांदवडेकर आणि मयुर वकानी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळं मालिकेचं चित्रीकरण पुन्हा एकदा थांबवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाच्या विळख्यात अनेक सेलिब्रिटी अडकले आहेत. यामुळे अनेक मालिका आणि चित्रपटांचं शूटिंग रखडलं आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारपाठोपाठ त्याच्या तब्बल ४५ सहकलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे.

हे सर्व कलाकार अक्षय कुमारचा आगामी चित्रपट राम सेतू यातील आहेत. त्यामुळे राम सेतू चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. यामुळे या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम सेतू या चित्रपटाची शूटींग मड आयलँडला होत आहे. या शूटींगसाठी ५ एप्रिल रोजी १०० नवीन ज्युनिअर आर्टिस्ट काम सुरु करणार होती.

मात्र कोरोना चाचणी बंधनकारक असल्याने त्या सर्वांची चाचणी करण्यात आली. यावेळी त्यातील ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.



हेही वाचा

कार्तिक आर्यनचा 'धमाका', OTT प्लॅटफॉर्मवर अक्षय, वरूणला टाकलं मागे

‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा