ईएमआयवर विकली गेली जस्टिनच्या कॉन्सर्टची तिकिटे

  Mumbai
  ईएमआयवर विकली गेली जस्टिनच्या कॉन्सर्टची तिकिटे
  मुंबई  -  

  जस्टिन बीबर मुंबईत येणार म्हटल्यावर तरुण वर्गात कशी क्रेझ निर्माण झाली होती, ते बुधवारी दिसून आले. रात्री दीड वाजता तो मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याची एक झलक पाहण्यासाठी मुंबईच्या कलिना विमानतळावर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

  जस्टिन बीबरचे ट्विटरवर 9 कोटी, 34 लाख 41 हजार 977 फॉलोअर्स आहेत. फोर्ब्सने जस्टिनला तीनवेळा जगातील सर्वात पॉवरफुल सेलिब्रिटींच्या यादीत ठेवले होते.

  विशेष म्हणजे जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टच्या तिकिटाची किंमत 15000 पासून ते 75000 पर्यंत आहे. अनेकांनी त्याचा हा कॉन्सर्ट पाहण्यासाठी ईएमआयवर तिकीट खरेदी केले आहे. कंपनीने ईएमआयवर तिकीट खरेदी करण्याचा पर्याय दिला आहे. त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी लोक देखील या संधीचा पुरेपुर वापर करत आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.