Advertisement

'अमर' चा अजरामर प्रवास


'अमर' चा अजरामर प्रवास
SHARES

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या आयुष्याचा थोडक्यात घेतलेला आढावा-


  • विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबरला पाकिस्तानच्या पेशावरमध्ये झाला होता. फाळणीनंतर पूर्ण कुटुंब मुंबईत आले.
  • विनोद खन्ना यांचे वडिल किशनचन्द्र खन्ना टेक्सटाईल बिझनेसमन होते. तर आई कमला खन्ना गृहिणी होत्या.
  • विनोद खन्ना पाच भाऊ बहिणींपैकी एक होते. त्यांना एक भाऊ आणि तीन बहिणी होत्या.
  • १९६൦ नंतर त्यांचे स्कूलिंग शिक्षण नाशिकच्या एका बोर्ड स्कूलमध्ये झाले.
  • शाळेत असताना त्यांच्या टीचरने त्यांना जबरदस्ती नाटकात उतरवले होते. तेव्हापासून त्यांना अभिनय करण्याची आवड निर्माण झाली.
  • त्यांच्या वडिलांची इच्छा होती की, त्यांनी कॉमर्स घ्यावे आणि अभ्यासानंतर घरातील बिझनेस करावा.


  • स्कूलिगनंतर वडिलांनी त्यांचे अॅडमिशन कॉमर्स कॉलेजमध्ये केले होते. पण विनोद यांचे मन त्यात लागले नाही.
  • कॉलेजला असताना त्यांनी थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या वडिलांना हे अजिबात आवडले नाही. पण विनोद यांच्या हट्टापुढे अखेर वडिलांना झुकावे लागले. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या विनोद यांना त्यांच्या वडिलांनी २ वर्षांचा कालावधी दिला.
  • १९६८ मध्ये आलेल्या 'मन की बात' या चित्रपटातून विनोद खन्ना यांच्या फिल्मी सफरला सुरुवात झाली. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.
  • १९७१ मध्ये आलेल्या 'हम-तुम' चित्रपटात त्यांना लीड रोल मिळाला. हा चित्रपट ऐवढा गाजला नाही.
  • १९७१ मध्ये आलेल्या 'मेरे अपने' या चित्रपटामुळे विनोद खन्ना प्रसिद्ध झाले. गुलजार यांनी या चित्रपटाची निर्मीती केली होती.
  • १९७१ मध्ये विनोद खन्ना यांनी गीतांजलीसोबत लग्न केलं. विनोद खन्ना यांना दोन मुलं झाली. त्यांची नावं त्यांनी अक्षय आणि राहुल ठेवली.
  • पण त्यांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही आणि विनोद खन्ना आणि गीतांजली हे वेगळे झाले.
  • गीतांजली यांच्याशी वेगळे झाल्यानंतर त्यांनी कविताशी दुसरं लग्न केलं. त्यांना कवितापासून दोन मुलं आहेत. साक्षी आणि श्रद्धा अशी दोघींची नावं आहेत.
  • करिअर चांगले सुरू असताना अचानक १९८२ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टी सोडली आणि ओशोंचे भक्त बनले.
  • १९८७ मध्ये त्यांनी 'इंसाफ' या चित्रपटातून पुन्हा चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं.
  • विनोद खन्ना हे पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील विद्यमान खासदार होते.
  • 1968 ते 2013 या दरम्यान त्यांनी 141 चित्रपटांत काम केले आहे.

  • 'दयावान' या चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. त्याचप्रमाणे 'अमर अकबर अँथोनी', 'द बर्निंग ट्रेन', 'मेरे अपने', 'मेरा गाव मेरा देश', 'गद्दार', 'कुर्बानी', 'कुदरत' या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका ही अजरामर आहेत.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा